तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
काेल्हापूरः विशाळगडच्या पायथ्याशी गजापूर येथील मुस्लिम वस्तीत कांही समाजकंटक घुसले आणि ज्यांचा अतिक्रमणांशी काहीही संबंध नसलेल्या नागरिकांच्या घराची तोडफोड करून राडा केला. राडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आजरा येथील मुस्लिम समाजाने तहसीलदार यांचेकडे केली आहे.नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी (शिवसेना उ बा.ठा.) गटाचे समीर चांद म्हणाले की, विशाळगडापासून 4 ते 5 कि. मी. अंतरावर गजापूर हे गाव आहे. अतिक्रमणाशी या गावाचा काडीचाही संबंध नसताना तेथील मुस्लिम वस्तीला लक्ष्य करुन राजकीय पोळी भाजण्यासाठी पाळीव टोळक्यांनी या ठिकाणी भ्याड हल्ला केला. यात हिंदू बांधवांचा काडीचाही संबंध नाही तर ज्याप्रमाणे साताऱ्यामध्ये याच पाळीव टोळक्यांनी जसा उपद्रव केला होता, त्याचपद्धतीने सांगली, मिरज, पुणे येथील आलेल्या टोळक्यांनीच हे कृत्य केल्याचे प्रसारमाध्यमे व प्रशासनाच्या द्वारे निदर्शनास येत आहे. जर प्रशासनाने साताऱ्याच्यावेळीच या टोळक्याना जेरबंद करून कठोर कारवाई केली असती तर आज विशाळगडावर पुनरावृत्ती झाली नसती.
अतिक्रमणाच्या नावाखाली रविवार दि १४ रोजी काही समाजकंटकांनी विशाळगड आणि पायथ्याशी असलेल्या गावातील मुस्लिम समुदायावर पूर्वनियोजित कट करून भ्याड हल्ला केला, दगदफेक आणि जाळपोळ केली असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. मशिदीची, दर्ग्यांची तसेच घरांची, दुकानांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून महिला, लहान मुलांवर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवरसुद्धा जीवघेणे हल्ले केले ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
या घटनेचा आम्ही समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करीत कायदा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या व भ्याड हल्ले करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे या विकृत व देशविघातक प्रवृत्तीच्या मागे असणाऱ्या सूत्रधारांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणीही केली. यावेळी समीर चांद, आरिफ भाई खेडेकर, कुदरत लतीफ, सलीम लतीफ, जुबेर सोने खान, अमजद माणगावकर,गौस माणगावकर, इम्रान पटेल, गौस मुल्ला, जबील अडकूरे, सलाउद्दीन शेख, इरफान काझी, जुबेर माणगांवकर, अब्दुल करिम कांडगावकर,बबलू शेख,जमील निशानदार,मौजुद माणगावकर आदी उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.