मिरज : येथील स्कॉलर्स पब्लिक स्कूल व जीवनज्योत जुनिअर कॉलेज मिरज- मालगाव रोड, मिरज येथे शनिवार दिनांक ४फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत सातवे विद्यार्थी साहित्य संमेलन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने आयोजित केले आहे, अशी माहिती दमसा अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे, शिवानंद तेलसंग यांनी दिली.
४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या विद्यार्थी संमेलनात इ.४थी ते९वी मध्ये शिकणाऱ्या जिल्ह्यातील स्वलेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कथाकथन, काव्य वाचन, पाठ्यपुस्तकातील लेखकांशी गप्पा, मुलाखत ,पुस्तक प्रदर्शन असे कार्यक्रमआहेत.
या संमेलनात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कथा कवितांची निवड होणार आहे, त्यासाठी शनिवार दिनांक २१/१/२०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा परिषद शाळा वानलेसवाडी ,नवीन कोर्टासमोर विजयनगर सांगली (संपर्क ९९६०७२४२७७)येथे विद्यार्थ्यांना पालक किंवा शिक्षकांनी त्यांच्या लेखन साहित्यासह उपस्थित राहण्याचे वा फोनवर संपर्क करून नोंद करून वेळ घेऊन भेटण्याचेआवाहन विद्यार्थी साहित्य संमेलन समितीने केले आहे. या समितीत भीमराव धुळूबुळू, विनोद कांबळे, दि.बा.पाटील, नामदेव माळी, दयासागर बन्ने, मुस्ताक पटेल, शरद नेजकर ,तुकाराम गायकवाड, कृष्णात पाटोळे, स्वाती शिंदे पवार, मनीषा पाटील ,सुषमा डांगे, ताई गवळी ,गौतम कांबळे, बाबासाहेब परीट ,महादेव माने आदींचा समावेश आहे.
अशा चांगल्या कार्यक्रमाचे स्वागतच- POSITIVVE WTACH