कोल्हापुरात मणिपूर मध्ये झालेल्या घटनेचा तीव्र जाहीर निषेध…
कोल्हापूर – मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड तर्फे मणिपूर मध्ये झालेल्या घटनेचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करून मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना पोलीस उप अधीक्षक मा जयश्री देसाई मार्फत निवेदन देण्यात आले. मे २०२३ पासून मणिपूर राज्यात हिंसा चालू असल्याचे ऐकिवात होते. पण तेथे विशेषतः महिलांवर जे असाधारण अमानुष जाहीर अत्याचार झालेत व त्यात आता पर्यंत १६० जीव गेलेत हे अडीच महिन्यानंतर आता देशातील बहुतांशी जनते समोर आल्यावर देश स्तब्ध व सुन्न झाला आहे.
अत्यंत निंदनीय घटने बाबत राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड तर्फे यातना व खेद सह जाहीर निषेध नोंदवत आहे. भविष्यात वेळीच अशा मन हेलावणाऱ्या घटना स्पष्ट बाहेर आल्या तर जन भावनांचा मानसिक दबाव निर्माण होऊन वेळीच आळा बसावा यासाठी ठोस उपाय योजना व्हावी. खरतरं प्रत्येक स्त्रीने वेळीच दुर्गा व्हावं – घटना या लगेच घडत नाहीत. संशयाची पाल चुकचुकली की आवाज लगेचच उठवायचा असतो. अशा बाबतीत सहनशीलता कामाची नाही वेळीच घरात व सहकारी मित्र मैत्रिणींना सांगता आलं पाहिजे. म्हणजे वेळीच अशा घटना ह्या टाळता येतील. सहनशील ते मुळे या घटना घडतात हे प्रत्येकीने लक्षात ठेवावे.
पिडितांना लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत. या घटनेवर जर ठोस पावलं उचलले गेले नाहीत तर संपूर्ण भारतात जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड आंदोलनाचा एल्गार करेल असा इशारा सरकारला दिला. वाईट याचं वाटतं घटना घडल्यानंतर दोन महिने झाले तरीही अद्याप एकही मंत्री घटनास्थळी पोहोचले नाहीत. याचा निषेध करण्यात आला. या वेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चारुशिला पाटील, प्रियंका कोइंगडे, रंजना पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, भगवान कोईंगडे,मदन परीट, सचिन गुरव, अमोल गावडे उपस्थित होते.