अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील घटकांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ योजना

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा…

कोल्हापूर : केंद्र शासनाने सन 2015 मध्ये ‘स्टँड अप इंडिया’ योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सिडबीने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला सिडबी हमी देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेचा लाभ घेऊन प्रकल्पाची उभारणी केली आहे, अशा अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील घटक उद्योजकांना 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन देणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्या नंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.