शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांसह ८ मंत्र्यांना शपथ

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राजभवन येथे रविवारी दुपारी झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.