कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव… मराठी संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

“मराठी पाऊल पडते पुढे” कार्यक्रमाला भरभरुन दाद…

कोल्हापूर – शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवात मंगळवारी दसरा चौकात झालेल्या मराठी सणवार व मराठी संस्कृतीवर आधारित नृत्य संगीताचा आविष्कार “मराठी पाऊल पडते पुढे” या कार्यक्रमाला नागरिकांनी टाळ्या व शिक त्यांच्या गजरात भरभरुन दाद दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

मराठी संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मराठी पाऊल पडते पुढे या प्रयोगाचे मागील २६ वर्षांपासून देशभरात ४ हजारांहून अधिक प्रयोग सादर झाले आहेत. पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा नियोजन समिती, कोल्हापूर यांच्या वतीने हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

  • गीत, वाद्य, नृत्य यांचा त्रिवेणी आविष्कार असणाऱ्या मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात सादर झालेल्या ओवी, भूपाळी, वासुदेव, गणेशवंदना, शेतकरी, वाघ्या मुरळी, जोगवा, कोळी नृत्य, गोंधळ अशा अनेकविध गीतांनी व त्यावरील नृत्याविष्कारांनी कोल्हापुरकरांची मने जिंकली. या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती व दिग्दर्शन उदय साटम यांचे होते.विदेशी पाहुण्यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी शाही दसरा महोत्सवास किंग्ज कॉलेज ऑफ लंडनचे व्हाइस प्रेसिडेंट श्री. व सौ. ॲडम यांनी खास उपस्थिती दर्शवली. या शाही दसरा महोत्सवामुळे कोल्हापूरच्या संस्कृतीची भुरळ पडल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भाऊ कदम, ओंकार भोजने अभिनित ‘करुन गेलो गाव’नाटकाचे गुरुवारी आयोजन…

शाही दसऱ्यानिमित्त बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता दसरा चौक येथे रंगमंचावर राजेश देशपांडे दिग्दर्शित व भाऊ कदम, ओंकार भोजने अभिनित ‘करुन गेलो गाव’नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हे नाटक विनामुल्य असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.