कसबा बावड्यातील सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी – सतेज पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…

कोल्हापूर – कसबा बावडा परिसराला ऐतिहासिक वारसा आहे. राजर्षी शाहू महाराजांची ही पवित्र जन्मभूमी आहे. कसबा बावड्यातील सर्व जाती धर्मातील लोक सुखाने गुण्यागोविंदाने रहात आहेत. मात्र काही लोक येथे जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. पोलीसांनी तातडीने तपास करून संशयीतांना अटक करावी. असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

साडेतीन शक्तीपिठांपैकी कोल्हापूर हे एक आहे. करवीर निवासीनी अंबाबाई देवीचा सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. सर्वत्र धार्मिक वातावरण आहे. कसबा बावडा येथील शांतता भंग व्हावी. सर्वधर्मिय लोक शांततेत रहात असताना त्यांच्यात धार्मिक तेढ निर्माण व्हावे असा उद्देश ठेवून काही लोक सोशल मिडीयाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तीना पोलीसांनी वेळीच ठेचण्याची गरज आहे.

पोलीसांनी अशा समाजकंटकाना तातडीने जेरबंद करावे. तसेच कसबा बावड्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जातीय सलोखा टिकविण्यासाठी व शांतता अबाधीत राखण्यासाठी दक्ष रहावे असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी पत्रकातून केले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.