गडहिंग्लज येथील युवा उद्योजक व अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे यांची आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट…
गडहिंग्लज – गडहिंग्लजमध्ये आज सकाळी एक दुःखद घटना घडली असून गडहिंग्लज येथील युवा उद्योजक व अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलासह आत्महत्या केली आहे. सदरची घटना समजल्या नंतर संतोष शिंदे यांच्या घरी गडहिंग्लज येथील व्यापारी वर्ग व त्यांच्या मित्र मंडळींनी गर्दी केली होती. त्यावेळी संतोष शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहली असून दोन व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहलेली सुसाईड नोट घटनास्थळी पोलिसांना मिळून आली. सदरची बातमी नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी गडहिंग्लज बंद करण्याचा निर्णय घेतला तर ‘त्या’ दोन व्यक्तींना अटक करावी अशी मागणी पोलिसांच्याकडे केली.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की गडहिंग्लज येथील गांधीनगर येथे राहत्या घरी आज सकाळी संतोष शिंदे त्यांच्या पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांनी आत्महत्या केलेचे समजले. सदरची घटना काल रात्री अकरा नंतर झालेचे पोलिसांच्या प्राथमीक तपासात आढळून आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संतोष शिंदे यांनी सुसाईड नोट लिहली असून त्यामध्ये दोन व्यक्तींनी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न व त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेचा उल्लेख असल्याचे समजते. सदरची गोष्ट गडहिंग्लज येथील नागरिकांना समजलेनंतर नागरिकांनी ‘त्या’ दोन व्यक्तींच्या निषेर्धात गडहिंग्लज बंदची हाक दिली त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तर त्या दोन व्यक्तींना अटक केलेशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पोलीस प्रशासनाला इशारा यावेळी नागरिकांनी दिला.
सदरची घटना राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर बेडरूममध्ये झाली असून प्रथम विष घेऊन धारदार कटरने गळा चिरल्याने संतोष शिंदे (वय-४४) तेजस्विनी शिंदे(वय-३६) तर अवघ्या १४ वर्षाचा मुलगा अर्जुन शिंदे या तिघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते. घटनास्थळी पोलिसांनी प्राथमिक पंचनामा झालेनंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. तर गडहिंग्लज पोलिसात सदरच्या घटनेचा गुन्हा दाखल करणेचे काम चालू असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निखेश पाटील यांनी भेट दिली. तर अधिक तपास पोलीस उपधीक्षक राजीव नवले व पोलीस निरीक्षक गजानन सरगर करीत आहेत.
संतोष शिंदे यांची एक यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. त्यांचा गडहिंग्लजसह जिल्हाभर मित्रपरिवार दांडगा आहे. तर मनमिळावू स्वभाव असणाऱ्या संतोष यांच्या अचानक एक्झिट मुळे गडहिंग्लजसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.