“मी शाहू बोलतोय” कार्यक्रम 25 जून रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह मध्ये…
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 149 व्या जयंती निमित्त महाराजांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे “मी शाहू बोलतोय” या कार्यक्रमाचे रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे रात्री 8 वाजता आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार असून जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे सादरीकरण सुप्रसिद्ध कलाकार राहुल सोलापूरकर करणार आहेत. आगामी ‘लोकराजा शाहू’ या चित्रपटातील काही एक्स्ल्सुझिव (exclusive) दृश्ये या कार्यक्रमा दरम्यान दाखवून महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार आहे. शाहिरी परंपरेनुसार काही पोवाडे देखील यावेळी सादर होणार आहेत, असे सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.