विजय बकरे
एका दिवसाच्या पावसाने राऊतवाडी धबधबा चालू…
राधानगरी – कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा शुक्रवारी सायंकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे राऊतवाडी धबधब्याला पाणी आल्याने तो पाहण्यास आज शनिवारी सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येत होते. तेथे असणारी सुविधा व स्वागत कमान पाहून पर्यटक आकर्षक झाले आहेत असे सुविधा शासनाने राऊतवाडी धबधब्याला देऊन पर्यटन आकर्षक केले आहे अशी प्रतिक्रिया पर्यटकाकडून येत आहे.
राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी पर्यटन व वन्यजीव विभागामार्फत ज्या सुविधा धबधब्यावर केल्या आहेत. राधानगरी तालुक्यात पर्यटन स्थळे अतिशय सुंदर करण्यासाठी कोठ्यावधीचा निधी आणला आहे. पर्यटनाला चालना देण्याचे काम आबिटकर करत आहेत. त्या बद्दल पर्यटकांच्याकडून अभिनंदन होत आहे.