केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची सावली केअर सेंटरला सदिच्छा भेट…
कोल्हापूर – केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकारने विविध क्षेत्रात केलेली कामे आणि उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचाव्या यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे विविध संस्था आणि समाजातील मान्यवर यांना भेटी देऊन त्या बहुविध कामांची सविस्तर माहिती देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 24 जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सावली केअर सेंटर, राधानगरी रोड, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली.
त्यांनी सावलीचे काम विस्तृतपणे समजून घेतले, त्याचबरोबर रुग्णांची ही संवाद साधला आणि समाधान व्यक्त केले. रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान एकंदरीतच सर्व स्वच्छता हे बघून त्यांनी सावलीच्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष करून कौतुक केले. सावली सारख्या संस्थांची देशभरातील सर्व मोठ्या शहरांमध्ये गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्यासमवेत कोल्हापूरचे खासदार श्री धनंजय महाडिक हे होते.