मोरेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील व श्रेयस कोरवी यांचा सत्कार करताना आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व इतर मान्यवर…
पाचगाव – ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मोरेवाडी गाव एकसंघ झाले असून यामुळे गावच्या विकासाला बळ मिळणार आहे,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी मोरेवाडी येथे केले. मोरेवाडी येथील महाडिक गटाचे ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील आणि श्रेयस कोरवी यांनी कार्यकर्त्यांसह आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी यावेळी बोलताना आपण सतरा वर्षे महाडिक यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. सर्वसामान्यांच्यासाठी काम केले. यामुळे आपण तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो. मात्र महाडिक गटाचे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे आपण कार्यकर्त्यांसह आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस गटात प्रवेश केला केला आहे असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केले. यावेळी मोरेवाडी चे सरपंच ए व्ही कांबळे, उपसरपंच दत्तात्रेय भिलुगडे, ग्रामपंचायत सदस्य अमर मोरे, सुनील शिंदे, पाचगाव चे माजी सरपंच संग्राम पाटील, पाचगावचे उपसरपंच संजय शिंदे यांच्यासह मोरेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.