नामदेव शिंपी समाज युवक संघ, शिरूर तालुका आयोजित संत नामदेव महाराज जीवन चरित्र मार्गदर्शन व युवक एकत्रीकरण, चर्चासत्र…
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील संत शिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे रविवार दिनांक 4/06/2023 रोजी दुपारी ठीक 4 वाजता संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन चरित्र विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी श्री संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज ह. भ. प. निवृत्ती महाराज माधव नामदास यांचे संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन चरित्र यावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
वारकरी संप्रदायाला विश्वरूप प्राप्त करून देणारे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक राष्ट्रसंत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे यंदाचे हे ७५३ वे जयंती वर्ष असून ६७३ वे समाधी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संत नामदेव महाराज जीवन चरित्र मार्गदर्शन तसेच शिरूर तालुक्यातील युवक समाज बांधवांचे एकत्रीकरण व चर्चासत्र आयोजित केले आहे.
समस्त नामदेव शिंपी समाज तळेगाव ढमढेरे. नामदेव शिंपी समाज महिला मंडळ तळेगाव ढमढेरे. नामदेव शिंपी समाज गणेशोत्सव मंडळ तळेगाव ढमढेरे. सुधीर भाऊ ढमढेरे, युवा मंच. नामदेव शिंपी समाज युवक संघ शिरूर तालुका तसेच सर्व युवक समाज बांधव यांनी या मार्गदर्शन व चर्चासत्राला सहकार्य केले आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य नामदेव युवक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांनी केले आहे.