एस. टी. कर्मचारी कांग्रेसच्या मेळाव्यात ग्वाही…
कोल्हापुर – एस टी कर्मचारी वर्गाच्या पाठीशी नेहमी राहू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.नुकताच महाराष्ट्र एस टी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेचा कामगार मेळावा जिल्हा कॉंग्रेस कमिटी येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी शहर कॉंग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण तर प्रमुख पाहुणे सरचिटणीस श्रीरंग बरगे होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी मान्यवरांचे स्वागत करुन संघटनेच्या कमाकाजाची स्पष्टाता करीत कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडविंण्यासाठी वेळप्रसंगी चळवळी शिवाय पर्याय रहात नाही असे सांगितले.
आमदार सतेज पाटील म्हणाले की आमच्या सरकार नेहमी एस टी कर्मचारी वर्गाच्या पाठीशी राहिले असून कोविड काळात वेतनासाठी आमच्या सरकारने भरीव निधि उपलब्ध करुन दिला, एस टी कामगाराना कोविड लस प्राधान्याने दिली असे अनेक चांगले निर्णय घेतले शिवाय संप कालावधित आपल्या संघटनेने पाच महीने कामावर उपस्थित राहून जनतेची सेवा केली हे संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून इथून पुढेही आम्ही एस टी कामगारांच्या पाठीशी नेहमी राहू अशी ग्वाही दिली. |
सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की काम करुन देखील एस टी कर्मचारी वर्गाचे वेतन वेळेवर मिळत नाही ही सध्याच्या सरकारकडून एस टी महामंडळास सापत्न पणाची वागनुक दिली जाते, सध्या महामंडळास लालपरी या साध्या गाड्यानंची आवश्यकता आहे त्याचाप्रमाने एस टी ला तोट्यातून बाहेर काढन्यासाठी एस टी चे बजेट हे राज्य शासनाच्या बजेट मधे विलीन करावे ही मागणी सर्वप्रथम आमच्या संघटनेने केली असून ती अजूनही कायम आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले की एस टी ही सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असून ती टिकली पाहिजे. आपल्या संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून जिल्हा व शहर कॉंग्रेस नेहमी आपल्या पाठीशी राहिल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमामधे संघटनेचे सेवानिवृत होत असलेले पदाधिकारी सर्वश्री मारुती पुजारी, नामदेव भोसले, राजेंद्र भोसले, बाळासो सालोखे, मारुती पोवार, दिलीप पाटील तसेच गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेने संताराम जाधव व प्रामाणिकपणे प्रवशांचा दोन लाखाचा ऐवज परत केल्याबद्दल एम ए मणेर यांचा सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष वगरे यांनी केले तर आभार काका कुलकर्णी यांनी मानले. कार्यकामास जेष्ठ नेते बबनराव थोरात, अध्यक्ष अय्याज चौगुले, कार्याध्यक्ष सुनील घोरपडे, अरविंद पाटील, रणजीत काटकर, उत्तम पाटील, श्रीनिवास कुंभार, तनवीर मुजावार, परवेज मोमिन, भगवान जाधव, उमेश गरजे, आर आर पाटील, प्रसाद शिंदे, बाळासो माने, शिवाजी डांगे, सूरज तमायचे, सचिन मुंडाळे, सचिन मलके, वैशाली पाटील,त्रिवेणी पाटील, सुनीता कोडोलीकर,दीपाली येलबेली, दिलशान बागवान, माधुरी केसरकर, अश्विनी चौगुले, सोनाली कोळी आदिनी सहभाग घेतला.