माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची ७८ वी जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत साजरी…
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांची ७८ वी जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत साजरी करण्यात आली. यावेळी स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील गटनेते विधानपरिषद अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते व आमदार जयंत आसगावकर, कर्नाटक विधान परिषदेचे आमदार प्रकाश होक्केरी, सचिन प्रल्हाद चव्हाण अध्यक्ष कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, बाळासाहेब सरनाईक माजी उपाध्यक्ष एम. एस बँक, सुर्यकांत पाटील बुध्याळकर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या उपस्थितीत करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन आदरांजली वाहिली गेली.
सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहूल पाटील, गोकुळ दूध संचालक बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, बाजीराव खाडे, दुर्वास कदम, संजय पवार वाईकर प्रदीप चव्हाण, किशोर खानविलकर, महम्मद शरीफ शेख, संपतराव पाटील, रंगराव देवणे, विजयानंद पोळ, सरलाताई पाटील,ईश्वर परमार, सुलोचना नायकवडी, उदय पोवार, हेमलता माने, लिला धुमाळ, भारती पोवार, अश्विनी जाधव, मंगल खुडे, आनंदा करपे, अंजली जाधव, सिंधू शिराळे, एन एन पाटील, विद्या घोरपडे, शुभांगी साखरे, संदिप पाटील, महादेव जाधव, डॉ. प्रमोद बुलबुले, सुमन ढेरे, यशवंत थोरवत, प्रदीप ढाकरे, राजेश चौगुले,पुजा आरडे, विजयसिंह पाटील, दत्तात्रय वारके, युवराज पाटील, बाबुराव कांबळे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.