माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कार्याची दखल…
कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना शहरवासीयांच्या वाचनात आली. एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या पोरांना अमानुषपणे कोल्हापुरात सोडून पळ काढला. ही बाब लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. एस. एल. कटकधोंड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तातडीने शोध मोहीम चालू करून मुलांच्या आजी-आजोबांशी संपर्क केला व सदरची मुले सुखरूप त्यांच्या ताब्यात दिली.
या माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कार्याची दखल घेत शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या वतीने एस. एल. कटधोंड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाई बाबुराव कदम, वैशाली सूर्यवंशी, गिता जाधव, प्रिया जाधव, योगिता पाटील, भाई सचिन जाधव व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.