राधानगरी एसटी आगाराचा भोंगळ कारभाराला नेमकं काेण जबाबदार.. यावर कारवाई काय हाेणार
राधानगरी – विजय बकरे
राधानगरी एसटी आगाराचा कारभार म्हणजे असून खोळंबा नसून पण खोळबा… येथील भोंगळ कारभाराला प्रवासी वर्ग वैतागला आहे, याचाच प्रत्यय पुणे मालवण या एसटी चालकांना वाहकाला आलाय. एस.टीची चांगली सेवा मिळेल. एस. टीनेच प्रवास करा असा नारा एस. टी. महामंडळाकडून लावला जात असतानाच , आजही काही मार्गावर प्रवाशांना तसेच एस. टीच्या चालक वाहकांना माेठा फटका बसत आहे. काही अधिकारी, कर्मचारी चांगले करत असतानाच एस. टी. टिकावी. प्रवाशी वर्ग रहावा यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र काहींच्या मुळे एस. टीचे नाव खराब हाेत आहे. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजाविणाऱ्या एस. टी. चालक वाहकांना त्याचे दुष्परिणाम साेसावे लागत आहेत, ही देखील दुसरी बाजू आहे. असेच म्हणावे लागेल.
मालवण एसटी आगाराची निगडी पुणे मालवण ( एम. एच. 13-cu7923) ही 26 जानेवारी रोजी पहाटे 4:30 वाजता राधानगरी बाजारपेठेमध्ये आली असता ,एसटी. बस पंचर झाल्त्यायाचे दिसून आले. त्यामुळे एसटीचे वाहक यांनी टायर पंचर झाल्याची माहिती राधानगरी एसटी आगारामध्ये दूरध्वनीद्वारे दिली. मात्र, या आगारांमधील कर्मचारी सकाळी आठ वाजता येणार असे चालक व कंडक्टर यांना सांगितले. त्यामुळे या एस. टी. बसमधून प्रवाशी करणाऱ्यांना याचा फटका बसला. त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. यात प्रवाशांचे अडीच तास वाया गेले. त्यानंतर, चालक व वाहक यांनी पाठीमागून येणाऱ्या सकाळी सातच्या मालवण आगाराची कोल्हापूर मालवण या एसटीने प्रवाशांना पुढील प्रवाशासाठी रवाना केले. त्यानंतर तरी राधानगरी डेपाेतून काेणी तरी यांत्रिकी विभागातील येईल, म्हणत मालवन पुणे आगाराचे चालक वाहक ताटकळत बसले ते तब्बल एक नव्हे दाेन नव्हे तर तब्बल सायंकाळी सहा वाजेपर्यंत थांबावे लागले.
अखेर सहा तास नंतर एसटीचे चाक पंचर काढून दिले .त्यानंतर ती एसटी मार्गस्थ झाली. यावर या एस. टीच्या चालक वाहकांसह प्रवाशांना देखिल नाहक मनस्ताप झालाच, शिवाय राधानगरी बाजारपेठेतच नव्हे तर अख्ख्या राधानगरी शहरात थांबून राहिलेल्या एस. टीची आणि टायर पंचरची चर्चा रंगली हाेती. एका बाजूला एस. टीची प्रतिमा सुधारण्यासाठी काही वरिष्ठ स्तरावरील तसेच सर्वसामान्य कर्मचारी अधिकारी मेहनत घेत असतानाच काही कर्मचारी, विलंब लावण्यात, निवांत काम करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे झाल्या प्रकाराची चाैकशी हाेऊन याचा नेमका खुलासा हाेणार का , संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई हाेणार का, कामात इतकी दिरंगाई लागण्याची नेमकी कारणे पुढे येणार का असा सवाल उपस्थित हाेत आहे.
आजही अनेक मार्गावर एस.टी. तांत्रिक कारणामुळे किंवा, पंचर हाेऊन बंद पडल्याची उदाहरणे सातत्याने दिसत असतात. काही ठिकाणी तत्काळ दुरुस्ती झाल्याचे दिसते, मात्र काही ठिकाणी हाेत असलेला विलंब हा वरिष्ठ अधिाऱ्यांपर्यंत पाेहाेचतच नाहीत. हे वास्तव आहे. यात हाल हाेतात. ते प्रवाशी आणि संबंधित एस. टी. चालक व वाहक यांचे.
ST ची सेवा सुरुळीत राहण्यासाठी, सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक व एकनिष्ठ कर्तव्य बजावलेच पाहिजे- POSITIVVE WATCH