WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर

कोल्हापूर – रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने रामानंदनगर येथील शिवानी पाटील या युवतीला एक लाख रुपये निधीतून टी स्टॉल देण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत ,आईच्या आजारपण सांभाळत अत्यंत निर्धाराने स्वतःच्या पायावर उभारण्याची जिद्द बाळगणाऱ्या “मिस चायवाली” शिवानीच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने रोटरी सेंट्रलने पाठबळ दिले आहे.

रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर आहे. गेल्या महिन्यात क्लबच्या वतीने महाराष्ट्राची गौरवगाथा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी जमलेल्या निधीतून समाजातील विविध घटकांना त्याच दिवशी मदत करण्यात आली. यानुसार गांधीनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन वॉटरफिल्टर युनिट, कुशिरे येथील आश्रम शाळेसाठी वॉटर फिल्टर युनिट, उमेद फाउंडेशन तसेच बालकल्याण संकुल या संस्थांना जीवनावश्यक साहित्य, बालेघोळ येथील शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या निधीतून एखाद्या युवतीला किंवा महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्याचा निश्चय रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत, आणि कम्युनिटी सर्विस डायरेक्टर प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि रोटरी सेंट्रलच्या सदस्यांनी केला. त्यानुसार माहिती घेत असताना मिस चायवाली या नावाने रामानंदनगर चौकात चहाचा स्टॉल चालविणाऱ्या

शिवानीबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार या दोघांनी शिवानीची प्रत्यक्ष भेट घेऊन तिच्या भविष्यातील वाटचालीविषयी जाणून घेतले. चहा देत देत शिवानी सांगत होती, ” माझे वडील वारले असून आईला सध्या औषध उपचारासाठी खर्च करावा लागतो. आम्ही घरासाठी अठरा लाखांचे कर्ज काढले आणि त्यापैकी सहा लाखांचे कर्ज फिटले आहे. उर्वरित कर्ज मी या चहाच्या स्टॉलवर काम करून भागवणार आहे. हा चहाचा छोटा स्टॉल मी भाड्याने घेतला आहे. सध्या गोखले कॉलेजमध्ये कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून त्याबरोबरच दिवसभर हा चहाचा व्यवसाय करते. नवीन मोठ्या आकाराचा चहाचा स्टॉल बनवून घेऊन त्यावर चहाबरोबर चपाती भाजी. तसेच अन्य नाष्टा सुद्धा सुरू करणार असल्याचे शिवानीने सांगितले.

तिच्या बोलण्यात कुठेही परिस्थितीबद्दल तक्रार नव्हती; उलट जीवनात आलेल्या परिस्थितीला सामोरे जात निश्चयाने वाटचाल करण्याचा निर्धार होता. तिचे हे बोलणे एकूण प्रभावित झालेल्या भगत आणि डॉ. नरके यांनी तुला हवा तसा चहाचा स्टॉल आम्ही रोटरी सेंट्रल मार्फत बनवून देऊ, असे सांगताच शिवानीच्या आनंदाला पारावर उरला नाही. उद्योजक आशिष शेवडे यांनी स्टॉल बनवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले. गेल्या आठवड्यात शिवानीचा हा नवीन स्टॉल सुरू झाला आहे. जिद्दीने आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे स्वप्न पाहणाऱ्या शिवानीला रोटरी सेंट्रलने दिलेल्या पाठबळामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. या स्टॉल्स हस्तांतरवेळी सेंट्रल चे अध्यक्ष संजय भगत, सेक्रेटरी रवी खोत, विजय रेळेकर ,पंडित कोरगावकर, डॉ.महादेव नरके, डॉ.समीर कोतवाल, अभय सोनवणे, सचिन गाडगीळ,सौ.संयोगिता भगत, सौ वर्षा वायचळ यांच्यासह बालाजी पार्क भागातील नागरिक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.