पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
| कोल्हापूर : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GN दि. 15 नोव्हेंबर पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-GP 16 नोव्हेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 16 व 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 10 येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.
लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी कळविले आहे.
लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही.पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. 16 व 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या कालावधीत कार्यालयात सादर करावा.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
धनाकर्ष शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.
- एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराकडून दि. 20 नोव्हेंबर रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात
सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील.
- एका पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल.
- फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल.
|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 537