ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी…
कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य शॉपिंग सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डीवायपी सिटी मॉल’ कोल्हापूरमध्ये दिपावली शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. येथील फूड कोर्ट आणि विविध आउटलेटवर शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
कोल्हापूरचा वाढता विस्तार व भविष्यकालीन गरजा ओळखून दूरदृष्टीचे नेतृत्व डॉ. संजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘डीवायपी सीटी’ मॉल शहराच्या वैभवात भर घालत आहे. खरेदी, खानपान, करमणूक व बच्चे कंपनीला खेळण्याचा मनमुराद आनंद या ठिकाणी लुटता येईल. डी. वाय. पी. सिटीमध्ये दिवाळीनिमित्त ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ‘दिपावली शॉपिंग फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने मॉल उजळून निघाला आहे.
दीपावलीनिमित्त लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले असून खरेदीवरही विशेष सवलत व विविध ऑफर्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कोणत्याही आउटलेटवर खरेदी केल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे. यामध्ये नशीबवान विजेत्यासाठी प्रत्येकी २ एलईडी टीव्ही व ओव्हन, प्रत्येकी ५ मिक्सर व टोस्टर, प्रत्येकी १० ब्ल्यु टूथ स्पीकर व इअर पॉड अशी आकर्षक बक्षिसे जिंकता येतील. त्यामुळे ग्राहकांनी डी. वाय. पी. सिटीसोबत खरेदीचा आनंद द्विगुणित करून बक्षिसे जिंकण्याचीही संधी मिळवा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































