दिव्यांगाना मुख्य सामाजिक प्रवाहात आणणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिल्ह्यातील 294 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप… पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या विशेष अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोल्हापूर – राज्यातील दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. पालकमंत्र्याच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी राबविण्यात आलेले विशेष तपासणी शिबिर व ऑन-द-स्पॉट कृत्रिम अवयव वाटप अभियानाप्रसंगी ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करता यावी.त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, शिक्षण, रोजगार तसेच सामाजिक जीवनात त्यांचा सहभाग अधिक प्रभावी आणि व्यापक व्हावा या उद्देशाने पालकमंत्री आबिटकर यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय,अलिम्को आणि एस. आर. ट्रस्ट, इंदौर यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान 29 जून ते 17 जुलै या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राबविण्यात आले होते. या शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली प्रत्येक लाभार्थ्याची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कॅलिपर्स, सहाय्यभूत उपकरणे तसेच संबंधित लाभार्थ्यांना तपासणीनंतर तत्काळ कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले तर काही लाभार्थ्यांसाठी आवश्यक मोजमाप घेऊन पुढील प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली.

या उपक्रमातून जिल्ह्यातील 294 दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध कृत्रिम अवयवांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित लाभार्थी व त्यांचे कुटुंबियांनी पालकमंत्री आबिटकर, जिल्हा प्रशासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, अलिम्को व एस. आर. ट्रस्ट यांच्या या लोकाभिमुख उपक्रमाबद्दल समाधान मानून आभार व्यक्त केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.