तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडून 10 अनधिकृत शाळेची यादी जाहीर
कोल्हापूर : नवीन शौक्षणिक वर्ष दिनांक 15 जून 2023 पासून सुरू झाले असून यामध्ये इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गात प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरु आहे. कोल्हापूर शहरा बरोबर ग्रामीण भागात तब्बल 15 शाळा शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये बंद केल्या आहेत. यावर्षी या शाळा अनधिकृतपणे सुरु केल्या असल्यास या शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये अन्यथा त्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी अशा उबाळे यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार कुठलेही व्यवस्थापन विना परवानगी शाळा सुरू करू
अनधिकृत शाळेंची नावे खालील प्रमाणे
1) हातकणंगले तालुक्यातील :-1) ओम पब्लिक स्कूल कुंभोज, 2) समर्थ इंग्लिश स्कूल, संभापूर, 3) आयडिल सेमी इंग्लिश स्कूल इंग्लिश, इंगळी 4) महादेव तातोबा गाताडे प्राथमिक विदयालय इंगळी. 2) शाहूवाडी तालुक्यातील :-1) शामराव दाभाडे आश्रमशाळा मौजे चनवाड व 2) बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूल, उकोली. 3) चंदगड तालुक्यातील :-1) गुरुकूल इंग्लिश मिडीयम स्कूल, तर्केवाडी 2) सनशाईन इंग्लिश स्कूल चंदगड. 4) शिरोळ तालुक्यातील :-1) टॅलेंट इंग्लिश मीडियम स्कूल उमळवाड व 2) विद्याकुंज कोडिग्रे. 5) कागल तालुक्यातील :-1) सेंट अॅन्स इंग्लिश मिडीयम स्कूल बाचणी व 2) इंग्लिश प्रायमारी स्कूल व्हनाळी या अनधिकृत शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. 6) पन्हाळा तालुक्यातील :- 1) एस.एन. खाडे करिअर अॅकडमी सातवे, या शाळेमध्ये 1 ली ते 5 वी प्रवेश सुरु असून प्रवेश घेण्यात येवू नयेत. 2) आदित्य विद्या निकेतन –पणारे, या शाळेमध्ये 1 ली ते 8 वी सुरु असून प्रवेश घेण्यात येवू नयेत. 7) चंदगड तालुक्यातील :-1) प्रेमांगण इंग्लिश स्कूल-हेरे या शाळे मध्ये 1 ली ते 3 री प्रवेश सुरु असून प्रवेश घेण्यात येवू नये.
शकत नाही. अन्यथा त्या कलम 18 (5) नुसार कारवाईस पात्र आहेत. अशा विना परवानगी 15 शाळांची यादी शिक्षण विभागाने तयार केली आहे. या सर्व शाळांवर शिक्षण विभागाकडून दंडात्मक कार्यवाही सुरु आहे. संबंधित अनधिकृत शाळा सुरु राहिल्यास संबधित व्यवस्थापनास 1 लाखाचा दंड व सुचना देवूनही शाळा बंद न केल्यास प्रति दिवस दहा हजाराचा दंड ठोठाविण्यात येणार आहे. पालकांनी अशा अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये, अन्यथा पाल्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास ही जबाबदारी पालकांची राहील. असेही शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी स्पष्ट केले आहे.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.