WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ORDER- अपघात टाळा; नियम पाळा! अन्यथा कारवाई- अनिल तनपुरे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूरचे आदेश 
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम दरम्यान शहरातील रहदारी नियमनाबाबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. साखर कारखान्यांना जिल्ह्यातुन व इतर ठिकाणाहून ऊस वाहतुक व पुरवठा केला जाणार आहे. मात्र ही ऊस वाहतुक ही ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या इत्यादी वाहनाने केली जाते. कोल्हापूर शहरातील वाहनांची रहदारी पाहता शहरातील वाहतुक सुरक्षित व नियंत्रित राहणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याची दक्षता घेणेसाठी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित  यांचे आदेशान्वये वाहतुकीचे नियम अंमलात आणले आहेत. त्यामुळे त्याचे  काटेकाेरपणे पालन करावे, असे आवाहन, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी केले आहे. ऊस वाहतूक करणा-ऱ्या अवजड व जड व मध्यम वाहनांनी पर्यायी व सोयीच्या मार्गाचा वापर करून दिला आहे, त्याच मार्गाने वाहतूक करावी अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असाही इशारा अनिल तनपुरे यांनी दिला आहे. शहरातील वाढती गर्दी.. वाहनांची संख्या, रस्त्यांची सुुरु असलेली कामे यामुळे वाहतूकीचा खाेळंबा हाेऊ नये तसेच अपघात हाेऊ नयेत यासाठी ऊस वाहतूकदारांच्या  मार्गात व वेळेत बदल केले असून, त्यांची गांभिर्याने दखल घ्यावी  असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. 
ऊस वाहतूक अशी असेल.
– खाली दिलेल्या मार्गावरुन ऊस वाहतुकीची भरलेली अथवा रिकामी वाहने कोल्हापूर शहरातील वाढलेल्या वाहनांची संख्या पहाता वाहतूक कोंडी होवू नये, अपघाता सारखी घटना घडू नये यासाठी ऊस वाहतुकीच्या वाहनांनी कोल्हापूर शहरातून रात्रौ १०.०० वा. पासुन सकाळी ०६.०० वा. पर्यंत च्या वेळेत करावी. 
१) श्री. छ. राजाराम कारखान्याकडे :- अ) तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल चौक पोलीस अधिक्षक कार्यालय – कसबा बावडा मेन रोड राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ होतील. ) बालींगाकडून फुलेवाडी रंकाळा टॉवर रंकाळा स्टैंड गंगावेश डावीकडे वळण छत्रपती शिवाजी 
ब)महाराज पुल उजवीकडे वळण सी पी आर सिग्नल चौक महावीर कॉलेज कसबा बावडा मेन रोड- राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ होतील. 
क) भोगावती व कळंब्याकडून पुईखडी नवीन वाशी नाका उजवे वळण रिंग रोड कळंबा – संभाजीनगर – रिंगरोड – सायबर चौक – हायव कॅटिन डावे वळण उडडाण पुल ताराराणी पुतळा – सदरबाजार – धैर्यप्रसाद हॉल – पोलीस अधीक्षक कार्यालय कसबा बावडा राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ होतील. 
२) डी. वाय. पाटील कारखाना व कुडित्रे कारखान्याकडे – २) डी. वाय. पाटील कारखाना व कुडित्रे कारखान्याकडे – 
अ) तावडे हॉटेल कडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल हेडपोस्ट ऑफीस महावीर कॉलेज- सीपीआर सिग्नल उजवे वळण शिवाजी पूल चौक डावे वळण गंगावेश उजवे वळण- रंकाळा स्टॅन्ड – रंकाळा टॉवर फुलेवाडी डी. वाय. पाटील कारखाना व कुडिजे कारखान्याकडे मार्गस्थ होतील
) बिद्री कारखान्याकडे तावडे हॉटेल कडून
 अ) ताराराणी पुतळा डावे वळण उडडाण पूल हायवे कॅन्टीन चौक सायबर चौक डावे वळण – रिंगरोड मार्गे संभाजीनगर डावे वळण कळंबा बिद्री कारखान्याकडे मार्गस्थ होतील.
४) भोगावती कारखान्याकडे तावडे हॉटेल कडुन 
अ) ताराराणी पुतळा डावे वळण उडडाण पूल हायवे कॅन्टीन चौक संभाजीनगर डावे वळण-कळंबा साई मंदिर उजवे वळण रिंगरोड सायबर चौक डावे वळण – रिंगरोड मार्गे नविन वाशीनाका डावे वळण-भोगावती कारखान्याकडे मार्गस्थ होतील. कारखान्याकडे मार्गस्थ होतील. 
५) दत्त दालमिया कारखान्याकडे तावडे हॉटेल कडून नविन वाशीनाका डावे वळण-भोगावती अ) ताराराणी पुतळा उजवीकडे वळण सीपीआर सिग्नल उजवे वळण सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल हेडपोस्ट ऑफीस महावीर कॉलेज – छत्रपती शिवाजी महाराज पुल दत्त दालमियाँ कारखान्याकडे मार्गस्थ होतील. 1 2 
०६) क्रशर चौक-इंदिरा सागर हॉकी स्टेडीयम शेंडा पार्क सायबर चौक या ठिकाणावरुन कोणत्याही प्रकारचे ऊस वाहतुकीचे वाहन ऊसाने भरलेले अथवा रिकामे रिंगरोड व्यतीरिक्त शहराचे आतीलमार्गावर प्रवेश करणार नाही. 
 
०७) ताराराणी सिग्नल चौक ते दाभोळकर सिग्नल चौक ते सीपीआर हॉस्पीटल चौक ते छ. शिवाजी महाराज पुतळा चौक ते पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर कोणत्याही प्रकारचे ऊस वाहतुकीचे ऊसाने भरलेले अथवा रिकामे वाहन वाहतुक करणार नाही. 
०८) कोयास्को चौक व तावडे हॉटेल ते ताराराणी सिग्नल ते धैर्यप्रसाद हॉल चौक ते पोलीस अधीक्षक, कार्यालय चौक ते पोस्ट ऑफिस चौक ते महावीर कॉलेज चौक ते सीपीआर हॉस्पीटल चौक ते छ. शिवाजी महाराज पुल ते दत्त दालमिया कारखान्याकडे जाणारी- येणारी ऊस वाहतुकीची ऊसाने भरलेली अथवा रिकाम्या वाहनांनी रात्रौ १०.०० वा. ते सकाळी ०६.०० वा. पर्यंतच वाहतुक करावी. इतर वेळेमध्ये त्यांना प्रतिबंध करणेत येत आहे. 
पाेलिसांची ही बातमी देखील जास्त वाचली गेलीGOOD NEWS- पाेलीस खेळणार… रंगणार स्पर्धांमध्ये! काेल्हापूरला सन्मान
०९) फुलेवाडी नाका-चिवा बाजार-कळंबा हॉकी स्टेडीयम-सायबर हायवे कॅन्टीन (केएसबीपी चौक)- कोयास्को चौक- उंचगांव-एनएच-4 हायवे-शिये-कसबा बावडा-राजाराम कारखाना, शिये भुये-वडणगे मार्गे दालमिया कारखाना हा मार्ग ऊस वाहतुकी करीता २४ तास खुला राहील 
**महत्वाची सूचना**
 ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर वाहनामध्ये वाहतुक सुरु असताना मोठ-मोठयाने स्पिकर वाजविण्यात येतात ते वाजविण्यात येवु नयेत, ट्रक, ट्रॉली, बैलगाडी इ. वाहनामध्ये प्रमाणापेक्षा जादा (ओव्हरलोडींग) ऊस भरु नये, 
वाहनाचे पाठीमागील बाजुस रिफ्लेक्टर असणे आवश्यक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वरील निर्देश हे दिनांक २२/११/२०२४ रोजी पासुन श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व कोल्हापूर जिल्हयातील इतर कारखान्यांचा गळीत हंगाम संपेपर्यंत ऊस वाहतुक करणारे ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडया इत्यादी वाहतुक करण्यासंदर्भात निर्देश देण्यात येत आहेत. तसेच आवश्यक वेळी परिस्थितीनुसार योग्य ते निर्देश वेळोवेळी देण्यात येतील. तरी ऊस वाहतुक करणारे वाहनधारक यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्या अनुषंगाने सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या चालक मालक यांनी नियमांचे पालन करावे असे वाहतूक शाखेचे अनिल तनपुरे स्पष्ट केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.