जिल्हा कार्यकारिणीची बैठक महेश सेवा समिती इचलकरंजी येथे पार पडली त्यामध्ये निवड…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी उद्योजक नितीन धूत तर सचिवपदी लालचंद गट्टाणी यांची एकमताने निवड झाली. जिल्हा कार्यकारिणीची बैठक महेश सेवा समिती इचलकरंजी येथे पार पडली त्यामध्ये वरील निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा विविध सामाजिक कार्याबरोबरच समाजाला संघटित करून त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवीत असते. जिल्हा माहेश्वरी सभेची कार्यकारणी निवडण्यासाठी इचलकरंजी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली. गेली अनेक वर्षे सभेच्या माध्यमातून विविध कार्यात अग्रेसर असणारे व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष उद्योजक नितीन धूत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिवपदी लालचंद गट्टाणी यांची पुन्हा निवड करण्यात आली.
अन्य कार्यकारिणी अशी – वरिष्ठ उपाध्यक्ष : बनवारीलाल झंवर, उपाध्यक्ष बजरंगलाल काबरा, सुरेशचंद दरगड, दिलीप बजाज (करवीर), राजकुमार बलदवा (जयसिगपूर), कोषाध्यक्ष – अशोक कुमार मंत्री, संगठन मंत्री : बालकिशन टुवाणी, सांस्कृतिक मंत्री : दामोदर बाहेती, सहसचिव श्रीकांत बंग, सुरेन्द्र हेडा, बिपीन जाजू (करवीर). अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य : श्रीकांत मंत्री, भिकूलाल मर्दा, घनश्याम इनाणी. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य : शांतिकिशोर मंत्री, वासुदेव बांगड, रामनिवास मुंदडा, कैलाशचंद धूत, मुकेश खाबाणी, रामअवतार भूतडा, श्यामसुंदर झंवर, मोहनलाल चांडक(करवीर), दिलीप बजाज (जयसिंगपूर).
निवडी एकमताने होण्यासाठी समाजाचे वरिष्ठ चंदनमल मंत्री, गोपाल दरगड, गिरिराज मोहता, राजाराम चांडक यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी निवर्तमान अध्यक्ष श्रीकांत मंत्री, पूर्व अध्यक्ष शांतीकिशोर मंत्री यांच्या जिल्हा माहेश्वरी सभेचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी राजगोपाल चांडक सातारा व ऐडवोकेट नंदकिशोर बाहेती, इचलकंरजी यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली.