विनायक जितकर
कोल्हापूर शहरामध्ये झुंजार क्लब च्या वतीने कैलासवासी विष्णुपंत इंगवले यांच्या स्मरणार्थ इंगवले सर चषकाचे आयोजन…
कोल्हापूर जिल्ह्याचा फुटबॉल हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी १६ एप्रिल पासून इंगवले सर चषकाचे आयोजन या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील खेळाडू तयार व्हावे व फुटबॉलला चालना मिळावी आणि कोल्हापुरातील प्रलंबित ग्राउंडना निधी मिळावा या उद्देशातून या चषकाचे आयोजन झुंजार क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.
इंगवले सर चषकाचे बक्षीस वितरण माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सामना पाहताना कोणतीही हुल्लडबाजी किंवा गालबोट लागू नये याची दक्षता कोल्हापूर वाशीयांनी व फुटबॉल प्रेमींनी तसेच पोलीस प्रशासनाने घ्यावी असे आवाहन रविकिरण इंगवले यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. |
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.