गोकुळ कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या. कोल्‍हापूर. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना संघाचे संचालक माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर, संचालक बाबासाहेब चौगुले बयाजी शेळके आदी.

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे संचालक माजी आमदार डॉ सुजित मिनचेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना संघाचे संचालक सुजित मिणचेकर म्हणाले की भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले या महापुरुषांपैकी एक अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर अनेक कार्यक्रम होत असतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गासाठी तसेच एकंदरीतच जो वर्ग समाजामध्ये कायम अनेक बाबतीत दुर्लक्षिला गेला आहे अशा सर्वच वर्गांसाठी कायदेशीर तसेच आंदोलनाच्या मार्गाने उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. असे मनोगत सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले बयाजी शेळके जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संमती बँक इचलकरंजी चे संचालक संजय चौगुले सुरेश वरेकर, सचिन दिंडे बाळासो राऊत तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.