शिराळा (जी.जी.पाटील)
सोनावडे येथे महिला दिन कार्यक्रम उत्साहात
सोनवडे येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त शाळेतील बागेत उन्हाची, पावसाची, थंडीची तमा न बाळगता मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. अशा कामगार महिला व वसतिगृहातील जेवण करणा-या महिलांचा सन्मान करण्यात आल्याने महिलांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेठरेच्या सरपंच प्रा. वंदना ठोंबरे होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यालयातील शिक्षिका भगिनींचा सत्कार प्राचार्य एस. ए. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दिवस रात्र, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विद्यालयाच्या बागेत काबाड कष्ट करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.वंदना ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला.सौ एम आर पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा इतिहास सांगताना रायगडाचा कडा अंधारात उतरणारी हिरकणी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या स्त्रियांविषयी आपले विचार मांडले तसेच दिपाली पवार यानी दगडाची कथा म्हणजे दगडाला घाव घातल्यानंतर आकर्षक मूर्ती तयार होते व विज्ञान कथा महिलांना सांगून प्रोत्साहनात्मक माहिती दिली .अध्यक्षीय भाषणात ठोंबरे यांनी गार्गी, मैत्रेयी या विषयावर स्त्रियांविषयी मनोगत व्यक्त करत कर्तुत्वान स्त्रियांविषयी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम आर पाटील यांनी केले. यावेळेस कामगार महिला, शशिकला शेळके, एस एस. आंबी, प्रा. डॉ. सदा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आर. एन. नाईक यांनी मानले.