विनायक जितकर
शिवसेना महिला आघाडी कोल्हापूर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच युवतीसेना कोल्हापूर यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करायची मागणी…
आज स्त्री ही पुरुषांसोबत प्रत्येक क्षेत्रात काम करण्यात अग्रेसर आहे. म्हणूनच राज्यसरकार सरकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या स्तनदा महिलांच्या सोईसाठी सरकारी कार्यालये, एस, स्टॅन्ड हिरकणी कक्ष स्थापन करण्याचे आदेश राज्य दिले आहेत, पण ते आदेश फक्त घोषणेपूरते मर्यादित आहेत असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे, कारण याची अंमलबजावणी कोठेही नाही.
कोल्हापूर शहर व जिल्हा गजबजलेला असतो, इथं येणाऱ्या महिलांचीही संख्या हजारो च्या घरात आहे. त्यामुळे राज्यसरकारने आता फक्त घोषणा बाजी करून उपयोग नाही. तर हे हिरकणी कक्ष अंमलात आणले पाहिजेत, याचबरोबर शिवाजी विद्यापीठ जिथं हजारो माता शिक्षणासाठी ये जा करतात तिथंही कक्ष कागदावरच आहे, त्यामुळे आपण आदेश देऊन या हिरकणी कक्ष ची स्थापना करून घ्यावी अन्यथा या प्रश्नी आम्हाला आंदोलन करावे लागेल.
असे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघाटीका स्मिता सावंत मांडरे , सविता कानूरकर, मंगल पोवार, स्वरूपा कुरदळे,सुरेखा गाडीवडर, जयश्री पाटील, नम्रता पाटील, अश्विनी देसाई, सानिका दामूगडे, अनिता ठोंबरे, वंदना शेळके,विद्या साळोखे, माधवी लोणारे, शोभा खेडकर उपस्थित होत्या.