विनायक जितकर
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांची मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी…
कोल्हापूर – नुकताच प्रदर्शित झालेला द केरला स्टोरी या चित्रपटाच्या माध्यमातून लव जिहादच्या विषयावर वास्तववादी परखड चित्र जनतेसमोर आणले आहे. धर्मांतरासारख्या गोष्टींचा ही पोलखोल या चित्रपटातून झालेला असून हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
लव जिहाद या विषयावर आधारित द केरला स्टोरी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. लव जिहाद सारख्या मुद्यामुळे हा चित्रपट हिंदू-मुस्लीम धर्मांतील विविध गोष्टींवर प्रकाश टाकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील हा चित्रपट पाहिल्या नंतर आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे प्रतिबिंब या चित्रपटातून उमटत असल्याचे नमूद केले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून देशातील महिलांना कशा पद्धतीने धमक्या देऊन, अत्याचार करून धर्मांतर करुन दहशवादी संघटनेच्या कामात वापरले जात आहे, याचे वास्तववादी चित्रण दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लव जिहाद प्रवृत्तीला रोखण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण आपल्या धर्माबद्दल सजग असले पाहिजे याची जाणीव निर्माण होत आहे.
आज याविषयात भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना इमेलच्या माध्यमातून निवेदनाद्वारे हिंदू मुलींच्या जागृतीसाठी, हिंदू रक्षणासाठी दिशादर्शक ठरणारा हा चित्रपट आपल्या महाराष्ट्र राज्यात टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी केली आहे.