राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे संविधानिक आणि वैध सरकार असल्याचे सिद्ध झाले : खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे संविधानिक आणि वैध सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे राजकीय दृष्टीने नव्हे तर कायद्याच्या चौकटीनुसार पाहिले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आज अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. ज्यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. तर निवडणूक आयोगाचा निर्णय सुध्दा न्याय व्यवस्थेने मान्य केला आहे. त्यामुळे साप साप म्हणून भुई थोपटणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे वेगवान निर्णय घेत असून, यापुढेही लोक विकासाच्या अनेक योजना अमलात येतील आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार यापुढेही यशस्वी कामगिरी करेल, याचा विश्वास वाटतो.