विजय बकरे
आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात…
राधानगरी – योग विद्या ही प्राचीन काळापासून भारतात प्रचलित आहे मनशांती व शरीराला व्यायाम मिळावा या हेतूने केंद्र सरकार च्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. योग म्हणजे अनंत योग म्हणजे संस्कार योग म्हणजे परमानंद समजत राधानगरी येथील महाराणी राधाबाई कन्या विद्या मंदिर वतीने नऊ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी योग गुरु अध्यापक सातारा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून योग्य शिक्षण धडे दिले या योग दिनाच्या अवचित साधून मार्गदर्शन केले. यावेळी राधानगरीचे पत्रकार विजय बकरे योग दिन निमित्य त्यांचा सत्कार शाळे च्या मुख्याध्यापिका सौ वर्षा पालकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाळेच्या अध्यापिका सौ मीनाक्षी पाटील अध्यापक सातारा पाटील अध्यापक विठ्ठल केंगार हे शिक्षक हजर होते.