हात गाड्यांसह दुचाकी, रिक्षाची तोडफोड दोन्ही गटात सीपीआरमध्येही हाणामारी…
कोल्हापूर – शहरातील व्हिनस कॉर्नर इथे पार्किंगच्या वादातून हॉटेल मालक आणि अंडा आमलेट हातगाडी चालकामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडलाय. यावेळी दोन्ही गटाकडून झालेल्या चाकू हल्ल्यात परस्परविरोधी गटातील पाच जण जखमी झाले आहेत. शिवाजी आप्पासाहेब मोरे, वैभव शिवाजी मोरे, आकाश वरणे तर दुसऱ्या गटातील इकबाल गुडन शेख आणि गुडन सय्यद शेख अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान जखमींना सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी देखील दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली यामध्ये सीपीआरच्या दर्शनी भागाची काच देखील फुटली आहे. या घटनेने सीपीआर च्या अपघात विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विनोद कॉर्नर इथं शिवाजी मोरे यांचा हॉटेल आहे तर हॉटेल समोरच शेख यांच्या अंडा आमलेटच्या हातगाड्या आहेत. हॉटेल समोर पार्किंग करण्याच्या वादातून शेख आणि मोरे यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली यावेळी दोन्ही बाजूंनी कांदा कापण्याच्या सुरीसह मिळेल ते हत्यारे घेऊन एकमेकांवर हल्ला सुरू झाला यावेळी मोरे यांच्या समर्थकांनी शेख यांच्या दोन हातगाड्या उलथून टाकून एक दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली. यानंतर जखमींना सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले यावेळी पुन्हा दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. समर्थकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार केला त्यानंतर व्हिनस कॉर्नर सीपीआर मध्ये रात्रभर तणाव होता.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मोरे यांचे समर्थक सीपीआर रुग्णालयात मोठ्या संख्येने जमा झाले त्यांनी रुग्णालयात घुसण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संमेल अटी मार करून जमावाला पांगवले सध्या जखमी शिवाजी मोरे आणि वैभव मोरे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं. दरम्यान या घटनेमुळे सीपीआर परिसरासह व्हीनस कॉर्नर परिसरात रात्रभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.