भोगावतीसाठी दुसऱ्या दिवशी ५३ अर्ज दाखल…
परिते – कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भोगावती सहकारी साखर कारखाना या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी राशिवडे बुद्रुक, कौलव, कुरुकली, सडोली खालसा , कसबा तारळे गटासह महिला गट व इतर मागास गटातुन ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील,नामदेव पाटील यांनी अर्ज दाखल केले.
उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यावेळी बोलताना म्हणाले की, भोगावतीचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल करणार असून खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पाडावी तसेच बिनविरोध साठी आलेल्या प्रस्तावास आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी सांगितल. निवडणुक निर्णय अधिकारी निलकंठ करे, सहाय्यक अधिकारी युसुफ शेख यांनी उमेदवारी अर्ज स्विकारलेत.