WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कृती समितीची विश्वासाहर्ता कायमपणे टिकणे महत्वाचे:सुजित चव्हाण

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कृती समितीची विश्वासाहर्ता कायमपणे टिकणे महत्वाचे : सुजित चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापुरात कृती समितीच्या कामाबाबत जनतेमध्ये विश्वासार्हता आहे. टोल सह विविध प्रश्न कृती समितीने जनआंदोलने उभी करून मार्गी लावले आहेत. अशा अनेक चळवळीत कोल्हापूरचा नागरिक म्हणून राजेश क्षीरसागर यांच्यासह आम्ही शिवसेनेचे सर्वच पदाधिकारीही अग्रभागी राहिलो आहे. त्यामुळे कृती समितीची विश्वासार्हता टिकून राहणे गरजेचे आहे.

काल महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत साडेचार हजार कोटी केवळ कागदावरच, साडेचार हजार कोटी गेले कुठे? अशा पद्धतीची वक्तव्ये करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीबद्दल जनतेमध्ये साशंकता निर्माण करण्याचा एकप्रकारे प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता कृती समितीतील प्रतिनिधी हे जाणकार आहेत त्यांना निधी मंजुरीच्या प्रक्रीयेबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

कोणताही निधी मंजूर होत असताना किंवा विकासकाम होत असताना त्याकरिता आवश्यक निधी हा टप्प्याटप्प्याने संबधित खात्याकडे वर्ग केला जातो. या शासकीय प्रक्रीयेबद्दल कृती समितीचे सदस्य अज्ञभित असणे अशक्य आहे. मंजूर केलेला निधीतून टप्प्याटप्प्याने कामे केली जात आहेत व होणार आहेत हे समस्त कोल्हापूरवासियांना माहित आहे. पूरस्थिती नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून मंजूर रु.३२०० कोटी निधीतून करावयाच्या उपाययोजनांचे विविध टप्पे करण्यात आले आहेत. कन्व्हेन्शन सेंटरसाठीही रु.२७७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरणही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रंकाळा तलावावर सुरु असलेल्या सुशोभीकरणाची छायाचित्रे प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत. रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभास कृती समितीमधील सदस्य नारळ फोडायला होते. पंचगंगा नदी घाटावरील विद्युतीकरणाद्वारे केलेले सुशोभिकरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. हे वास्तविक चित्र कोल्हापुरातील जनता उघड्या डोळ्याने पाहत असताना कृती समितीने केलेली वक्तव्ये ही जनसामान्यात गैरसमज निर्माण करणारी होत आहेत. यामुळे कृती समितीच्या जनसामान्यातील विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. ही विश्वासाहर्ता टिकणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

यात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापूर शहराच्या इतिहासात आजतागायत कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर झाला नाही. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे ४५०० कोटींचा निधी मंजूर केला. याची माहिती समस्त कोल्हापूरवासियांना आहे. मंजूर केलेल्या निधी अंतर्गत होणाऱ्या कामांचे उद्घाटन करण्याचा हक्कही निधी मंजूर करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असणे साहजिकच आहे. परंतु, मंजूर केलेला निधी मिळालाच नाही कागदावरच आहे अशी भूमिका घेवून जनतेमध्ये गैरसमज निर्माण होईल अशी वक्तव्ये जाणकार कृती समितीकडून होणे आश्चर्यकारक आहे.

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात© कोल्हापुरात विकासाचे काम सुरु आहे. कोल्हापूरच्या विकासाचेच ध्येय ठरवून महानगपालीकेस निधी मंजूर केला जात आहे. परंतु, कालच्या बैठकीतून जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीबाबत साशंकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूरला मिळालेला निधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेला निधी याची तुलना कृती समिती सदस्यांनी करावी आणि एकप्रकारे सुरु असलेला पक्षपातीपणा थांबवून कोल्हापूरच्या विकासाच्या मार्गात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही या पत्रकाद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.