बुध्दीमत्ता, आत्मविश्वास… अफाट कल्पनाशक्तीचा त्रिवेणी संगम, स्वप्ना प्रशांत यादव
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचा-यांना नव उत्साह देण्यासाठी शाखा अंतर्गत प्रीमिअर लीग क्रिकेटच्या भव्य स्पर्धा होत आहेत. त्यानिमित्त…!आज अनेक क्षेत्रामध्ये स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आणि यशस्वी होताना दिसतात. अशीच एक कर्तृत्ववान आणि यशस्वी स्त्री म्हणजे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. च्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव!…. ‘ती आली तीने पाहिले आणि ती जिंकली..!’
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा वटवृक्ष होण्यात संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. मात्र या वटवृक्षाला खरी बहर आणली ती सौ. स्वप्ना यादव यांनीच !…. पतसंस्थेसाठी काम करीत असतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा हातात घेतल्यानंतर मात्र त्यांच्या आकांक्षेचा वारु सुसाट वेगाने सुटला आणि नवनवीन कल्पना लढवीत पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासाचा अश्व संपूर्ण महाराष्ट्रात उधळला…. तीस वर्षांच्या कालावधीमध्ये आश्चर्यजनक 1 हजार कोटी ठेवींचा टप्पा पार करणा-या पतसंस्थेच्या यशामध्ये यादव मॅडम यांचा मोठा वाटा आहे. तळागाळातील लोकांना, गरजू अडलेल्यांना स्वतःच्या पायावर उभे करत त्यांना स्वावलंबी बनवणा-या या पतसंस्थेने आज महाराष्ट्रात 50 शाखा उभ्या केल्या ही कौतुकाची गोष्ट आहे. एक चिपळूणकर म्हणून आम्हाला नक्कीच अभिमान आहे!.. यादव मॅडम यांनी म्हणजेच पतसंस्थेने एकमेकांस सहकार्य करुन विकासाचा मूलमंत्र जपला आहे.
नुकताच संकल्पपूर्ती आनंद मेळावा झाला यामध्ये व्हिजन 2024 चे संकल्पचित्र जाहीर करण्यात आले… सर्वच विस्मयकारक…! आजपर्यंत यादव मॅडम यांनी एकादा संकल्प करावा आणि तो पूर्ण झाला नाही असे कधीच झाले नाही…. आपणच नवनवीन रेकॉर्ड करावे आणि आपणच ते तोडावे, मला वाटते यातच त्यांना मजा येत असावी.
पतसंस्थेप्रमाणेच मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या प्रकल्पाच्या यशामध्येही त्यांचा मोठा वाटा आहे. आपले पती उद्योजक श्री. प्रशांत यादव यांच्या बरोबर किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन त्या या प्रकल्पाच्या उन्नतीसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. अल्पावधितच या डेअरीचे सर्व उत्पादने सर्वांच्याच पसंतीत उतरले आहेत. काही दिवसातच 18 हजार किलोपर्यंची विक्रमी विक्री होणे हे मोठेच यश आहे. हा काही योगायोग नाही… यामागे प्रचंड मेहनत आहे.
कोणतेही यश सहज मिळत नाही त्यासाठी प्रखर मेहनत घ्यावी लागते. सौ. स्वप्ना यादव यांच्याकडे पाहिले की ‘झोकून देवून अव्याहतपणे काम करणे’ म्हणजे काय ते समजते. रात्रंदिवस काम काम आणि काम !… खरंतर 24 तास त्यांना अपुरेच पडत असावेत… मात्र असे असूनही कधी चिडचिड नाही, आदळाआपट नाही की आरडा ओरडा नाही..कायम प्रसन्न मुद्रेने काम!…. काम मात्र परफेक्ट लागते. त्यांच्या वाढदिनीही त्यांना घरी फायली तपासताना पाहून विचारले, ‘अहो मॅडम आज तरी काम न करता वाढदिवस साजरा करा..’ यावर त्या हसून उत्तरल्या, ‘वाढदिवस होतच राहिल काम थांबता कामा नये…’ अशी ध्येयवेडी माणसे असली की यश मिळायलाच पाहिजे !
सौ. स्वप्ना यादव यांची काम करण्याची पध्दत फार वेगळी आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना त्या आपलेपणाची वागणूक देतात. आपल्या अधिका-यांकडून आपल्या कर्मचा-यांकडून काम कसे करून घ्यायचे हे त्यांना चांगलेच माहित आहे. आपल्याकडे काम करणारा कुणीही असो आधी तो माणूस आहे हे त्यांचे म्हणणे… काम करणारी माणसे आनंदी असली, त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास नसला तर ते अधिक उत्साहाने काम करतात हा मॅडमचा दृष्टीकोन..!आणि म्हणूनच आपल्या कर्मचा- यांना कोणताही त्रास होऊ नये, ते शारीरिक, मानसिक तंदुरुस्त असावेत यासाठी ते विविध उपक्रम राबवित असतात. कर्मचा-यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना आणि उपक्रम त्या कायम राबवतात आणि म्हणूनच त्यांचे सर्वच कर्मचारी त्यांचा आदर राखत त्यांनी दिलेले ‘लक्ष्य’ वेळे आधीच पूर्ण करतात… कर्मचारी आणि सौ. स्वप्ना यादव यांच्यामध्ये छान बाँडींग असल्याचे दिसून येते.. नवनवीन उपक्रम राबवताना त्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करतात, घेण्यात येणा-या कार्यक्रमाला छान आकार देतात. प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन अगदी परफेक्ट असण्याकडे त्यांचा कल असतो.
अत्यंत बारकाईने आणि सर्वंकष विचार करुन त्या कार्यक्रमाचे नियोजन करीत असतात आणि म्हणूनच आजपर्यंत झालेले सर्वच कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. किंबहुना कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्या यशस्वीतेची चर्चा होते. एक मात्र आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्या स्वतः कायम पडद्यामागे रहातात. कोणताही गर्व नाही, कोणताही बडेजाव नाही.. इतर कर्मचा-यांप्रमाणेच त्या वावरताना दिसतात.. कार्यक्रम त्यांच्या मनासारखा झाला की त्यांच्या चेह-यावर एक समाधानाची लकेर दिसून येते…आणि मॅडम खूष झाल्या की कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह येतो….प्रत्येक काम त्या संपूर्णपणे आत्मविश्वासाने करतात. त्यांची कल्पनाशक्ती अफाट आहे.. त्यांच्या कल्पनेतूनच अनेक कार्यक्रम, उपक्रम राबवण्यात आले आहेत. अजूनही त्यांच्याकडे खूप योजना आहेत. त्यांना खूप काही करायचे आहे आणि त्या नक्कीच करणार यात शंका नाही.. त्यांची बुध्दीमत्ता प्रचंड आहे.. प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन त्या समजून घेतात.
आर्थिक व्यवहार सांभाळताना सामाजिक दायित्व, सामाजिक बांधिलकीही जपण्याची अत्यंत महत्वाची भूमीका त्या चांगल्या प्रकारे पार पाडतात.. अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे..त्यांच्या विषयी लिहू तेवढे थोडेच आहे. तूर्तास इथेच थांबतो…. कर्मचा- यांना नव उत्साह देण्यासाठी उद्या 30 एप्रिल आणि 1 मे रोजी पवन तलाव मैदान येथे शाखा अंतर्गत प्रीमिअर लीग क्रिकेटच्या भव्य स्पर्धेचे त्यांनी आयोजन केले आहे. या स्पर्धाही नेहमीप्रमाणेच दर्जेदार आणि यशस्वी होतील यात शंका नाही. या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रत्येक उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!
विशेष साैजन्य-राजेंद्रकुमार शिंदे
व्हिजन 3 न्यूज चिपळूण, 9822688771
VIDEO पहायला विसरू नका… वेब चँनेवर जा नि पहा.. |
VIDEO पहा– https://youtube.com/shorts/Mbuy7woO-wY?feature=share