जी. जी. पाटील (शिराळा)
ऍड. भगतसिंग नाईक (नाना) कला, क्रीडा, सांस्कृतिक व शिक्षण प्रबोधिनीच्या वतीने उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन.
शिराळा : विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत तसेच आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावा असे मत प. पु. स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष ऍड. भगतसिंग नाईक यांनी व्यक्त केले. ऍड.भगतसिंग नाईक (नाना) कला, क्रीडा, सांस्कृतिक व शिक्षण प्रबोधिनीच्या वतीने दिनांक ५/५/२०२३ ते १५/५/२०२३ या दरम्यान उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केल्याची माहिती ऍड. भगतसिंग नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक(दादा) म्हणाले, शिक्षणाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, विविध खेळांची त्यांना माहिती मिळावी तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा हेतू यामागे आहे म्हणूनच प्रबोधिनीतर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे म्हणाले. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक (बाबा) यांनी प्रास्ताविकात उन्हाळी क्रीडा शिबीर ५ मे ते १५ मे अखेर होणार असून योगा, रायफल शुटिंग, बॉक्सिंग, धनुर्विद्या, चित्रकला, मातीकाम, स्केटिंग, व्याख्यान, बॉलगेम्स, हे खेळ विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण शिबिरामध्ये ५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना रोज पौष्टिक अल्पोपहार दिला जाणार आहे. शिबिरामध्ये तज्ञ क्रीडा मार्गदर्शक खेळातील विविध कौशल्य शिकविणार असल्याचे सांगण्यात आले.