WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

चिपळूण नागरी पतसंस्थेचा २३ एप्रिल रोजी संकल्पपुर्ती आनंद व ग्राहक मेळावा

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निश्चीत केलेली उद्दिष्ट पूर्ण…

चिपळूण (प्रतिनिधी) – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निश्चीत केलेली उद्दिष्ट पूर्ण केल्याने दि. २३ एप्रिल २०२३ रोजी संकल्पपुर्ती आनंद मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या बहादुरशेखनाका चिपळूण येथील सहकार भवन मध्ये सकाळी ठिक १०.३० वाजता घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोदयोग मंत्रालय, मुंबई एस. बी. पाटील व जिल्हा उपनिबंधक सह संस्था, रत्नागिरी डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. ही यशस्वी वाटचाल संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३० वर्षाच्या कालखंडात ‘आपली माणसं आपली संस्था’ या ब्रीदवाक प्रमाणे गरजूंना तात्काळ कर्ज पुरवठा, सभासदांना ठेवीवर व्याजदर, शेती पूरक दुग्ध व्यवसायांसाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा यातून संस्थेने शेतकरी असो अथवा सुशिक्षित बेरोजगार असो या सर्वांना स्वावलंबी बनवण्यात हातभार लावला आहे. तसेच कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी रुपयांची मदत अथवा महापुरात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने पूरग्रस्त सभासदांना मदतीचा हातभार दिला. संस्थेने आर्थिक व्यवहार संभाळताना सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमात चिपळूण नागरी पतसंस्थेने सहभाग दर्शवत १५ ऑगस्ट रोजी सर्व शाखांवर ध्वजवंदन केले. तसेच या वर्षी “राष्ट्र अमृतवर्ष” साजरे करत असताना संस्थेने “राष्ट्र अमृतमहोत्सव” मासिक ठेव व मुदत ठेव या दोन ठेव योजना कार्यान्वीत करून या ठेव योजनेच्या माध्यमातून ठेव ४८८५ खातेदारांकडुन रक्कम रु. १३ कोटी ९४ लाखाहून अधिक ठेव रक्कम जमा आहे, अशा पदधतीने आर्थिक घटकांवर बचतीचे संस्कार घडविण्याचे काम संस्थेने केले आहे. दरम्यान, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने ३० व्या वर्धापनदिनी १ हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. या सप्टेंबर ते नोव्हेंबर या तिमाहीमध्ये एकूण ठेवीमध्ये ६७ कोटी ७६ लाख रुपयांची वाढ करून सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात एकूण १२७ कोटीने ठेवी व ८० कोटीने कर्जव्यवहार वाढीची संस्थेच्या ३० वर्षाच्या कालखंडातील विक्रमी वाढ झाली आहे.

याचबरोबर सन २०२१-२०२२ मध्ये उत्कृष्ट कामकाज केलेल्या सहकारी पतसंस्था म्हणून बँको पतसंस्था ब्ल्यू रिबनने सन्मानित केले आहे व सकाळ गृप वतीने आयडॉल ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांना वूमन इन्फल्यूएन्सर हा पुरस्कार देण्यात आला. याचबरोबर नवभारत ग्रुपच्या नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला सन्मानित करण्यात आले. यामुळे संस्थेची यशस्वी वाटचाल होत असल्याचे सिद्ध होत आहे.

यामध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अध्यक्ष विद्याधर अनास्कर विभागीय सहनिबंधक सह संस्था कोकण भवन, सहाय्यक निबंधक (पतसंस्था) महाराष्ट्र राज्य पुणे राम कुलकर्णी, सहाय्यक निबंधक लेखा परीक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे तानाजी कवडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे , अप्पर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. कोतमिरे, निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई एस. बी. पाटील, जिल्हा उपनिबंधक सह संस्था, रत्नागिरी डॉ. सोपान शिंदे या सर्वांनी संस्थेला भेट देत संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले आहे.

या यशस्वी वाटचालीसाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहेत . चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था नियोजित कामकाज पूर्ण करताना विविध उपक्रम घेत असते अशाच प्रकारे पूढील वर्षाचे नियोजन करताना सन २०२२-२३ चा संकल्पपुर्ती आनंद मेळावा व या आर्थिक वर्षातील पहिला ग्राहक मेळावा आयोजनाचे ठरविलेले आहे. सदर मेळाव्याला व्हिजन २०२४ चे संकल्पचित्राचे अनावरण करणेत येणार आहे तरी सर्व सभासद, ग्राहक व समन्वयक यांनी सदर मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन करणेत येत आहे.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी