WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर बाजार समितीत सत्ताधाऱ्यांची बाजी विरोधकांचा धुव्वा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

विरोधी शिव शाहू परिवर्तन आघाडीचा धुव्वा उडवला. सत्ताधारी आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने एकतर्फी दणदणीत विजय मिळवत विरोधी शिव शाहू परिवर्तन आघाडीचा धुवा उडवला. सत्ताधारी आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या. विकास सेवा संस्था गटात सत्ताधारी आघाडीने विरोधी आघाडीच्या उमेदवारांचा सरासरी सहा हजाराच्या मताधिक्याने तर ग्रामपंचायत गटात सरासरी 1000 ते 1500 च्या मताधिक्याने पराभव केला. तर विरोधी आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विरोधी आघाडीचे व्यापारी गटातील उमेदवार नंदकुमार वळंजू (३११ मते) हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर हमाल व मापाडी गटातून अपक्ष उमेदवार बाबुराव खोत यांनी बाजी मारली. सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के पी पाटील, संजय घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांनी केले.

विरोधी शिव शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे नेतृत्व खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील सरूडकर , राहुल देसाई, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुरलेकर, प्रा.जयंत पाटील प्रा. शहाजी कांबळे यांनी केले.

बाजार समितीसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाल्यामुळे निकाल काय लागणार याविषयी उत्सुकता लागली होती. रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा व्यापारी गटातील निकाल जाहीर झाला. यामध्ये विरोधी आघाडीचे नंदकुमार वळंजू यांनी बाजी मारली. तर सत्ताधारी आघाडीचे वैभव सावर्डेकर यांनी जास्त मते घेतली होती. दरम्यान विरोधी आघाडीचे उमेदवार अमर क्षीरसागर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. हमाल व मापाडी गटातील लढत अपक्ष उमेदवार खोत यांनी जिंकली. दरम्यान ग्रामपंचायत व अन्य गटातील मतमोजणीमध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार प्रारंभापासूनच आघाडीवर राहिले. मातादी के वाढत गेल्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करण्यास सुरुवात केली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निवडणुकीचा कल स्पष्ट झाला आणि बाजार समितीमध्ये सत्ताधारी आघाडीने बाजी मारली. एकूण १८ पैकी १६ जागेवर सत्ताधारी आघाडीने ही निवडणूक एकतर्फी जिंकली. सत्ताधारी आघाडीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- विकास सेवा संस्था गटात राजाराम तुकाराम चव्हाण ९३९७ , प्रकाश पांडुरंग देसाई ९५९२, प्रा. शेखर शंकराव देसाई ९३२१, बाळासो गणपती पाटील ९३१६ , भारत बाबासो पाटील भुयेकर ९३९५, सूर्यकांत रघुनाथ पाटील ९१५१, संभाजी आकाराम पाटील पैलवान ९२७७ , महिला प्रतिनिधी गटात मेघा राजेंद्र देसाई ९४९९, सोनाली शरद पाटील ९३५०, इतर मागासवर्ग गटातून शंकर दादासो पाटील ९७२६, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून संदीप कृष्णा वरंडेकर ९५३६, ग्रामपंचायत सदस्य गटातून सुयोग सुभाष वाडकर ३१७६, शिवाजीराव महादेव पाटील ३०१०, अनुसूचित जाती जमाती गटातून नानासो धर्मा कांबळे ३२३३, आर्थिक दुर्बल गटातून पांडुरंग गणपती काशीद ३२५९ तर अडते व व्यापारी गटातून कुमार किशोर अहुजा २७७ विजयी झाले. या गटामध्ये कुमार अवजा व वैभव सावर्डेकर यांना 277 इतकी समान मते मिळाली. चिट्टीद्वारे निकाल ठरवण्यात आला, यामध्ये अहुजा यांनी बाजी मारली.

विरोधी शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे उमेदवार व त्यांना प्राप्त मते पुढील प्रमाणे-कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था गटातील अर्जुन महादेव चौगुले २७८६, किरण गोविंद पाटील ३००४, बळवंत सदाशिव पाटील २९८६, बाजीराव सदाशिव पाटील ३०१४ , रणजीत वसंतराव पाटील २८०६ , प्रताप भैरु मेंगाने २५९३ , महिला प्रतिनिधी गटातील कविता शाहू चव्हाण २८८८ , अरुणा अशोक पाटील २६५२, तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातील अनिल श्रीकृष्ण वायकूळ २८०६ , विमुक्त जाती भटक्या जमाती गटातील मधुकर गणपती पाटील ३३००, ग्रामपंचायत गटातील संजय दत्तात्रय जाधव २२८०, सुरेश रामराव पाटील १४४५, अनुसुचित जाती जमाती गटातील उत्तम कांबळे २०५३ , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी गटात समाधान म्हातुगडे २०७९ , व्यापारी अडते गटातून अमर विलासराव क्षीरसागर २७३, तर हमाल गटातून राजाराम आबाजी जगताप ७३.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.