राधानगरी विधानसभा मतदार संघात महावितरण विभागाचा विक्रमी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध – प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मंजूरी पत्र वाटप कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश आबिटकर, अरुण जाधव, विजय बलुगडे आदी मान्यवर…

गारगोटी प्रतिनिधी – राधानगरी विधानसभा मतदार संघातील नागरीकांना व शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक यंत्र सामग्री, ट्रान्सफॉर्मर, विद्युत पोल व इतर कामांसाठी ‍जिल्हा नियोजन समितीमधून विक्रमी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सदर कामे तात्काळ सुरू करून नागरीकांची सोय करा अशा सुचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी केल्या. ते गारगोटी (भुदरगड) येथे मंजूर लाभार्थ्यांना मंजूरी पत्रे वाटप कार्यक्रमात बोलत होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील नागरीकांना नवीन विज जोडणी, उच्चदाब वाहिनी स्थलांतरीत करणे, अतिरिक्त रोहित्र सेंटर उभारणी करणे, घरगुती विद्युत कनेक्शन देण्यासाठी लघुदाब वाहिनी उभी करणे, एल.टी.लाईन रुपांतरीत करून व्हि.जी.करणे, विद्युत रोहित्र (डी.पी.) उभी करणे अशा कामांना जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने राधानगरी तालुक्यातील माजगांव 8.25 लाख, धामोड 11.77 लाख, चक्रेश्वरवाडी 8.88 लाख, आकनूर 6.80 लाख, पनोरी ते लिंगाचीवाडी लिंक लाईन टाकणे 6.88 लाख, सोन्याची शिरोली 6 लाख, कसबा तारळे बजारपेठ पेठलाईन विद्यूत वाहिनी उंची वाढविणे 1.14 लाख, रामणवाडी डी.पी.बसविणे 17.18 लाख, तुरंबे 9.55 लाख, कासारपुतळे 4.63 लाख, कुकुडवाडी 3.99 लाख, सरवडे 7.64 लाख, केळोशी बुद्रुक 4.90 लाख, भुदरगड तालुक्यातील पाटगांव 7.37 लाख, पुष्पनगर 6.26 लाख, वाघापूर 4.43 लाख, मानवळे 1.42 लाख, पाटगांव 1.20 लाख, तांबाळे 7.37 लाख, गारगोटी 7.33 लाख अशी लहान-मोठी 78 कामे असून याकरीता 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याकामी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले आहे.

यावेळी माजी उपसभापती अरुणराव जाधव, ‍शिवसेना तालुकाप्रमुख विजयराव बलुगडे, बी.एस.पाटील आकनुरकर, अरविंद पाटील, माजगांव सरपंच विद्याराणी पोवार, बाळासो देवर्डेकर, सुरेश देवर्डेकर, सागर भावके, धनाजी पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.