विनायक जितकर
बलिदान दिनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना शिवसेनेच्यावतीने विनम्र अभिवादन…
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व सुखांचा त्याग करून निरंतर ९ वर्षे स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराज हे शूर, पराक्रमी तर होतेच, शिवाय रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे ते आदर्श अधिपती होते. अशा या महापराक्रमी झुंझार महाराजांचे स्वराज्याप्रती असणारे प्रेम, निष्ठा, शौर्य आणि बलिदान अजरामर असून, धर्मवीर संभाजी महाराज समस्त हिंदूजनांचे दैवत आहेत, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी शिवसेना जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने पापाची तिकटी येथील स्मारकास अभिवादन करण्यात आले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय”, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय”, अशा जयघोषाने पापाची तिकटी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना श्री. राजेश क्षीरसागर यांनी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्च्यात स्वराज्याचा महामेरू पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत पसरविणारे युगपुरुष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे प्रतिभासंपन्न राजे होते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी, रयतेसाठी “जगावे कसे? हे शिकविले तर त्यांच्याच छत्रछायेत वाढलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देऊन “मरावे कसे”? हे शिकविले. अशा या महापराक्रमी राजांना अभिवादन करून त्यांच्या चरणी नतमस्तक होत असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, शहरसमन्वयक सुनील जाधव, फेरीवालेसेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, अश्विन शेळके, क्रांतीकुमार पाटील सम्राट यादव, श्रीकांत मंडलिक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.