शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या वतीने आयोजित छत्रपती शंभुराजेंच्या ३३४ व्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान करून केले अभिवादन…
स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे यांचा ३३४ वा बलिदान दिन. ज्या छत्रपतींनी या स्वराज्यासाठी बलिदान दिले त्या शंभुराजेंच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सामाजिक भान जोपासत शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी ९ वाजता प्रतिष्ठांनच्या वतीने रुईकर कॉलनी येथील छत्रपती शंभूराजे स्मारक परिसरातील छत्रपती शंभुराजेंच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रतिष्ठांनच्या वतीने स्मारक परिसरात वातानुकूलित मंडप उभारून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांसाठी नाश्ता व अल्पोपहार याची सोय देखील करण्यात आली होती. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सी.पी. आर. हॉस्पिटल) या रक्तपेढीच्या सहकार्याने व हॉस्पिटल स्टाफ यांच्या मागदर्शनातून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात प्रतिष्ठांनच्या सदस्यांसह एकूण ६० व्यक्तींनी रक्तदान केले. या मध्ये महिलांचा देखील सहभाग होता.
यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने ” शिवचरित्रातील शंभूराजे ” हे ऐतिहासिक पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. आपल्या अमूल्य अशा रक्तदानातून छत्रपती शंभुराजेंना शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यंदाचे हे शिबिराचे पाचवे वर्ष आहे. शिबिरानंतर शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या वतीने सी. पी.आर. हॉस्पिटल स्टाफ व डॉक्टर्स यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष – साताप्पा कडव , उपाध्यक्ष – योगेश रोकडे, संदीप पाडळकर, विशाल चव्हाण , सुनील यादव, अमोल पोवार, प्रवीण कुरणे, सागर साळोखे, सुजय भोसले, गणेश मांडवकर, सुधीर जितकर, मनीष बडदारे, तुकाराम खराडे, स्वप्नील पाटील, रुपेश जाधव, प्रशांत पाटील, प्रफुल्ल भालेकर, बंडू माळी, मनीष बडदारे, श्रीधर बावडेकर, नितीन पाटील, श्रेयस कुरणे, अक्षय वरेकर, सौरभ कापडी, राजवर्धन देसाई, नंदू कदम, प्रशांत जाधव, भाऊ पाटील, सुनील पाटील, अवधूत कणसे, शिवशक्ती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आदींसह सी. पी. आर हिस्पिटल मधील डॉक्टर व स्टाफ उपस्थित होते.