WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महिला सक्षमीकरणात आलाबाद ग्रामपंचायतीची उत्तुंग झेप..!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आजवर उत्कृष्ट काम करुन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे यशस्वी पाऊल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आलाबाद ग्रामपंचायतीने उचलले आहे. त्याचेच फलित म्हणून महिला-स्नेही संकल्पनेत तृतीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आलाबाद ग्रामपंचायतीला दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये गौरविण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते गावच्या सरपंच सौ.लताताई बाबुराव कांबळे, कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे व ग्रामसेवक अनिकेत संभाजी पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या आलाबाद ग्रामपंचायतीची ही उत्तुंग झेप म्हणावी लागेल.

आलाबाद हे 366 कुटुंबांचे 1 हजार 883 लोकसंख्येचे छोटेसे गाव. यात महिलांची संख्या 948 म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक आहे. शाळाबाह्य मुली, कमी वजनाच्या मुली, अशक्त मुली यांच्यासाठी आणि ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण यासाठी आलाबाद ग्रामपंचायतीच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळेच गावात एकही शालाबाह्य मुलगी नाही. याबरोबरच गावात त्या त्या वयानुसार कमी उंचीची मुलगी देखील नाही.

गावात स्तनदा व गरोदर महिलांची विशेष काळजी घेतली जाते. वेळेत लसीकरण, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करुन महिलांना चर्चेत सहभागी करुन घेतले जाते. तसेच महिला सभेच्या वेळी अधिकाधिक महिलांना एकत्र केले जाते.

ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण मोहिमेसाठी किंवा आरोग्य तपासणीसाठी महिलांना एकत्र आणणे हे तसे अवघड काम.. पण आशासेविका, एएनएम, अंगवाडी सेविका यांच्या मदतीने महिलांना त्यांच्या घरी लसीकरण करुन त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन दिले जाते. किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमध्ये जनजागृतीवर भर दिला जातो. गावाला महिला-स्नेही पंचायत बनवणे, महिला आणि मुलीं संबंधित प्रत्येक कामाची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि प्रेरिका ताई या कामांच्या नोंदी घेतात. तसेच गरोदर, स्तनदा माता, महिला व मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात. या सर्व कामांच्या निकषावर सन 2021-2022 या वर्षासाठी महिला-स्नेही संकल्पनेत ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी नोंदणी केली. महिला सक्षमीकरण आणि बाल विकासासाठी आलाबाद ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट कामाची नोंद घेत देश पातळीवरील तृतीय क्रमांकाने (2023) गावाला गौरविण्यात आले आहे.

 

गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, विस्तार अधिकारी दिलीप माळी, अमोल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ.लताताई बाबुराव कांबळे, ग्रामसेवक अनिकेत संभाजी पाटील, ग्राम पंचायतीचे कर्मचारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांनी काम केले.

महिला-स्नेही पंचायत बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच आलाबाद मध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फिल्टर हाऊसद्वारे ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. तसेच लोकवर्गणी, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावात सुसज्य रस्ते, जिल्हा परिषदेच्या उर्दु व मराठी शाळा आणि अंगणवाडीमध्ये विविध दर्जेदार सुविधा पुरविल्या जात आहेत. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या आलाबाद ग्रामपंचायतीचे काम अन्य ग्रामपंचायतीसाठी मार्गदर्शक म्हणावे लागेल.

विशेष सौजन्य

वृषाली पाटील, माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.