आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये सामंज्यस करार
कोल्हापूर : शासनाच्या आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्याकरिता बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये सामंज्यस करार करण्यात आला.
हा करार बँक ऑफ इंडियाच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व पुणे विभागीय सरव्यवस्थापक राधाकांत व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाला. हा करार पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, नागपूर संपूर्ण विदर्भ या भागासाठी करण्यात आला आहे. यामुळे राज्यात अधिक मराठा उद्योजक होण्याच्या दृष्टीने लाभ होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
या माध्यमातून महामंडळाच्या लाभार्थ्यांना CGTMSE व CGFMU या दोन क्रेडिट गॅरंटी देण्यात येणार आहे. जो तरुण क्रेडिट गॅरंटीच्या माध्यमातून कर्ज मागणी करतील त्यांना याचा लाभ देण्यात येईल. महामंडळाच्या योजनांचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेऊन, राज्यात उद्योजक निर्माण व्हावेत या दृष्टीने शासन आणि महामंडळ प्रयत्नशील आहे.