श्री देवी महालक्ष्मी मंदिर कळसारोहण समारंभास उपस्थिती.
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 11 मे रोजी सकाळी 7.25 वा. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व वाहनाने संभाजीनगरकडे प्रयाण. सकाळी 7.50 वा. संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 8.30 वा. संभाजीनगर निवासस्थानाहून गडहिंग्लजकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. श्री देवी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व श्री देवी महालक्ष्मी यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री देवी महालक्ष्मी मंदिर कळसारोहण समारंभास उपस्थिती. (स्थळ: श्री देवी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, गडहिंग्लज) सकाळी 11 वा. गडहिंग्लज येथून कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 12 वा. कै. सुधीर कदम यांच्या निवासस्थानी आगमन व त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट. (स्थळ: पिनाक प्रसाद अर्पाटमेंट जवळ, ऋतुगंध सोसायटी, महावीर कॉलेज, न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) दुपारी 1 वा. राखीव. सायं. 6 वा. श्री. सुनिल कुलकर्णी यांची सदिच्छा भेट. (स्थळ: कुलश्री बंगला, ई वॉर्ड, रुक्मिणीनगर, कोल्हापूर) सायं. 7 वा. पुण्याकडे प्रयाण.