WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

गोकुळचा आयर्नमॅन’…वाचा सविस्तर कोण?

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या, कोल्‍हापूर.

!! बातमी !!

गोकुळचे कर्मचारी नामदेव कळंत्रे झाले ‘आयर्नमॅन’

गोकुळमार्फत चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर: गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) चे कर्मचारी नामदेव मारुती कळंत्रे रा. इचलकरंजी हे गोकुळमधील पहिले ‘आयर्नमॅन’ कर्मचारी ठरलेबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थिती होते.

यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, आरोग्य चांगले व तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहार महत्वाचा असून प्रत्येकाने आपले शरीर स्वास्थ चांगले कसे राहील यासाठी प्रयत्न करणे गरजेच असून गोकुळचे वरिष्ठ अधिकारी नामदेव कळंत्रे यांनी जिद्दीच्या व मेहनीच्या जोरावती अवघड अशी हि स्पर्धा विहित वेळेपूर्वी पूर्ण करून ‘आयर्नमॅन’ (लोहपुरुष) हा किताब पटकावला. या मिळविलेल्या यशामुळे गोकुळ दूध संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे गौरोवद्गार चेअरमन डोंगळे यांनी याप्रसंगी काढले. तसेच नामदेव कळंत्रे यांना यापुढे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आवश्यक ती आर्थिक मदत व सहकार्य गोकुळमार्फत करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

सत्काराला उत्तर देताना नामदेव कळंत्रे म्हणाले की, जिद्द चिकाटी व ध्येयासक्ती हा कोल्हापूरच्या मातीचाच गुण असून सरावासाठी योग्य वातावरण असल्यामुळे ‘आयर्न मॅन’ झालो. यासाठी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व सर्व संघाचे संचालक मंडळ, प्रशिक्षक, संघाचे कर्मचारी व अधिकारी यांचे बहुमोल सहकार्य व प्रोत्साहन लाभले असल्याचे मनोगत व्यक्त केले.

यामध्ये ६१ देशातील सुमारे १,५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये एकूण ११३ किमीचे अंतर कळंत्रे यांनी अवघ्या साडेसात तासात पूर्ण केले. यामध्ये २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावणे अशा प्रकारात हे अंतर साडेआठ तासात पूर्ण करायचे होते. सुमारे ३६ डिग्री तापमान सहन करीत हे अंतर त्यांनी कमी वेळेत पूर्ण करून कोल्हापूरचे नाव उंचावले.

यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, प्रशिक्षक अमरपाल कोहली, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक जगदीश पाटील तर आभार शाहीर सदाशिव निकम यांनी मानले. यावेळी कळंत्रे यांचे प्रशिक्षक अमरपाल कोहली यांचा ही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

– ‘आयर्नमॅन’ नामदेव कळंत्रे यांचा गोकुळ परिवाराच्यावतीने सत्कार करताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील सर्व संचालक मंडळ आदी दिसत आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.