तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कोल्हापूरः
विनायक जीतकर-टीम मिडीया
कोल्हापूरः आज कोल्हापूर बसस्थानकात दुपारी डीबीच्या पथकाने व शाहुपूरी पोलिसांनी धरपकड केली. ११२ व पोलीस गाडी तिथे उभी होती. थोडीशी माहिती घेतली असता, समजले की ते पाकीटमार, चोऱ्या करणारे भुरटे चोरटे होते. पोलिसांचे याकामी कौतुकच करायला हवे. या चोरट्यांनी म्हणजे पाकीटमारी करण्याबरोबरच एका पँसेंजरला देखील तिथे मारहाण केली होती. तब्बल चौघांनी मिळून ही मारहाण केली. त्यामुळे या मारहाणीतूनच पोलिसांना माहिती मिळाली आणि शाहुपूरी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. व त्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी तिघांना शाहुपूरी पोलिसांनी ताब्यात घेत, पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, या ठिकाणी आणखी दोघे, भुरटे, दारु पिलेले होते. ते कोण होते. हे समजले नाही. ते पोलिसांना गयावया करत होते. आम्ही काहीच केले नाही. आम्ही दारू पित तिथ बसलो होतो. असे सांगत होते. पण त्या दोघा नशेबाज तरूणांना सोडून पोलीस गाडी निघून गेली. यावेळी तेथे उपस्थित नागरीक, प्रवाशी पोलिसांना सांगत होते. की, येथे दररोजच असे प्रकार चालत असतात. झोपायचे सोंग करून, हळहळू ब्लेड ने बसची वाट बसलेल्या प्रवाशांची खिसेकापू करण्याची त्यांची पद्धत आहे. असे अनेक दिवस येथे प्रकार सुरु असून, याठिकाणी बंदोबस्तला एकही पोलीस नाही. त्यामुळे ऐनवेळी चोरीचा प्रकार घडत असताना सांगायचे कुणाला हा प्रश्न पडतो. साहेब सहा ते दहाजणांचे टोळकेच बसस्थानकात आहे. त्यांचा चोरी हाच धंदा आहे. भोळपणाचा आव आणून, रोज कुणा ना कुणा प्रवाशांबरोबर भांडण, मारामारीचा प्रकार नित्यनियमाचाच ठरलेला असल्याचे पोलिसांना सांगत होते. त्यामुळे याचा बंदोबस्त करा साहेब. लय त्रास होतोय.
या धरपकडीतून दररोज घडत असलेला प्रकार तर पोलिसांना समजला पाहुया; यापुढे पोलीस कितपत लक्ष ठेवताहेत. येथे बंदोबस्ताला एकादा पोलीस मिळतोय. का ? डीबी पथक चाणाक्ष नजरेने असे चोरटे हेरून बंदोबस्त करतायत का ? आणि जागरूक नागरीक, प्रवासी, एस. टी, स्थानकातील प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यावर कसा अंकूश घालताहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. खरतर सुतावरून पोलीस मोठा तपास करतात! आता आज पकडलेल्या चोरट्यांपासून कोणता तपास करून, कुणाचे काय सापडले, काय मिळाले, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पोलिसांनी बस स्थानकात सुरु असलेली चोरट्यांची ही दहशत मोडून काढली पाहिजे. त्याला एस. टी. प्रशासनानेही साथ दिली पाहिजे तरच प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, आपले कोल्हापूर बस स्थानक सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांना वाटेल.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.