WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

घुसखोरी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यातून भूमिका व्यक्त करावी : संपादक सुरेश चव्हाणके

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर: सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरी विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते आणि सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. कोल्हापुरातील कळंबा येथे शिव प्रेरणा यात्रेअंतर्गत थेट मतदार संपर्क आणि विविध सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. “प्रबोधन मंच” व “सकल हिंदू समाज” यांच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले होते.

शेवटी आगामी निवडणुकांमध्ये “हिंदू जाहीरनामा” तयार करून तो सर्व पक्षांसमोर हिंदुत्ववादी संघटनांनी राष्ट्रीय भूमिकेतून ठेवावा व त्याविषयी पक्ष व उमेदवारांची भूमिका जाहीर करुन घ्यावी. हिंदू बहुल असणाऱ्या समाजाच्या हितासाठी याची दखल सर्व राजकीय पक्ष घेतील यासाठी व्यापक प्रमाणात प्रबोधन करावे असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले. प्रारंभी त्यांचे महालक्ष्मी प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.

निवडणूक आयोगाने वोट जिहाद संदर्भात आत्ता भूमिका घेतली असली तरीही वीस वर्षापासून आपण यावर या संदर्भात जनजागरण करीत आहोत. नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी वेळी प्रकर्षाने वोट जिहादची तीव्रता आणि त्याचे परिणाम प्रथमच निवडणूक आयोगासह सर्वांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेला आला आहे. असेही त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. केवळ निवडणुकीपुरती नव्हे तर बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजाने नेहमी संघटित राहून सामूहिक स्वरूपात आपल्यावर आगामी काळात येणाऱ्या संकटांविषयी सजगतेने कार्यरत राहणे ही काळाची गरज आहे असे मत चव्हाणके यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रबोधन मंचचे सुनिल वांकर, अनिरुध्द कोल्हापुरे, संग्रामसिंह निकम, सुनिल वाडकर, गजानन तोडकर, दीपक देसाई, उदय भोसले, प्रसन्न शिंदे, सुरज लोहार, नंदकुमार दिवटे, गंगाराम येडगे, निरंजन शिंदे, राजू तोरस्कर, विकास जाधव यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.