WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

नेते आवरा हो स्वतःला!…जनतेसाठी काम करा!

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

राज्यपाल महोदय, दखल घ्या! स्त्री सन्मानाच्या चिंधड्या होत आहेत!

आपल्या देशात कधी झाला नाही इतका मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांचा उपयोग वर्तमानात होताना दिसतो. २०१४ पासून या समाज माध्यमांचा उपयोग  आपल्या विरोधी पक्षाना नामोहरम करण्यासाठी करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले. समाज माध्यमातून आपली स्वतःची आयटी सेल, ट्रोलर तयार केले. त्यानंतर मग सगळेच राजकीय पक्ष समाज माध्यमातून आपली ही लढाऊ सैन्य तयार करू लागले आणि या माध्यमातून कितीही खालच्या पातळीवर जाऊन बोलले लिहिले तरी कोणी काहीच करू शकत नाही असा एक समज तयार होऊ लागला. सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीने  सायबर सेलचा वापर करताना दिसू लागला. गुन्हा कोणावर नोंदवावा कधी नोंदवावा आणि कधी नोंदवूच नये, तक्रार घेऊन नये हेही वादाचे झाले.

भाजप – शिंदे सरकार सत्तेत आल्यावर ज्याप्रकारे माध्यमातून युद्ध सुरू झाले आहे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप होत आहेत. अभद्र भाषेचा वापर समाज माध्यमातून होत आहे हे पाहता आपण पुरोगामी की सनातनी आहोत यापेक्षा किमान माणूस  म्हणून जगण्यास लायक आहोत का हा प्रश्न पडलेला आहे.

जर आपण सनातनी म्हणजे देवधर्म मानून इतरांना माणसाप्रमाणे जगू द्यायचं असं मानत असू तर कोणता देव, अल्ला सांगतो की महिलांना शिव्या द्या? महिलांना  मारा, कशीही भाषा वापरले तरी  देव अल्ला सगळं माफ करतो? आणि जर आम्ही पुरोगामी असू तर आमच्या शिवाजी महाराजांनी  स्त्री  आदर काय आहे याचे उदाहरण  कृतीतून दिलेले आहेच! शाहू फुले आंबेडकरांचे नाव जर घेणार असू तर स्त्री सक्षमीकरणासाठी शिक्षणासाठी या महान लोकांनी काय केलं याचं ज्ञानही आपल्याला असायलाच पाहिजे!

मात्र सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सगळेच सत्तेसाठी हाणामाऱ्या करतायेत, वर्चस्वासाठी काय काय करतायेत हे पाहताना कुठेतरी हे थांबलं पाहिजे! जनतेला न्याय मिळाला पाहिजे असं लोकमत मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांना एका मेसेजसाठी जी मारहाण झाली, त्यानंतर जे रान उठले, ठाण्यातील ठाकरे गटाच्या  कार्यकर्तीला शिंदे गटाच्या महिलांनी दमदाटी केली. एका पत्रकाराला मुख्यमंत्री शिंदे यांचा पीए म्हणवणाऱ्या राहुल लोंढे यांनी दमदाटी केली. प्रवक्ते मस्के हेही  दमदाटी करतात! त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही!

फेसबुक ट्विटर युद्ध रस्त्यावर आले, त्यात पोलीस हतबल झाले. पीडित महिलांची सुरक्षेसाठी तक्रार घेण्याची मागणीही पोलीस वरिष्ठांच्या दबावामुळे टाळू लागले! गृहखाते कोणाच्या दावणीला बांधले आहे काय? हा प्रश्न जनता विचारतेय! अरे हो, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल  मंत्री संजय शिरसाठ यांनी जाहीर वक्तव्य केले, त्यांना त्याबद्दल साधी दिलगिरी ही व्यक्त करावीशी वाटली नाही; याबद्दल मुख्यमंत्री  वा गृहमंत्री चकार शब्द बोलले नाहीत.

फेसबुक ट्विटर युद्ध रस्त्यावर आले, त्यात पोलीस हतबल झाले. पीडित महिलांची सुरक्षेसाठी तक्रार घेण्याची मागणीही पोलीस वरिष्ठांच्या दबावामुळे टाळू लागले! गृहखाते कोणाच्या दावणीला बांधले आहे काय? हा प्रश्न जनता विचारतेय! अरे हो, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल  मंत्री संजय शिरसाठ यांनी जाहीर वक्तव्य केले, त्यांना त्याबद्दल साधी दिलगिरी ही व्यक्त करावीशी वाटली नाही; याबद्दल मुख्यमंत्री  वा गृहमंत्री चकार शब्द बोलले नाहीत.

हा कोणता राजधर्म ? याचे उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देत नसतील आणि जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील तर राज्याचे पालक म्हणून नव्याने आलेले राज्यपाल  मा रमेश बैस यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्यायला हवी. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम  गोऱ्हे, यांनी अनेक विषयांमध्ये महिलांच्याबाबत भूमिका घेऊन विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न केलेत.

मात्र राज्यामध्ये जे काही महिला सुरक्षेबाबत अराजकी वातावरण तयार झाले आहे. पुरुष नेते कशाही प्रकारे बोलत आहेत! महिला कार्यकर्त्या एकमेकांशी हाणामारी करत आहेत, हे चित्र भयावह असे आहे. येणारा काळ महाराष्ट्रात आणखी मोठ्या प्रमाणात अराजकी माजेल की काय अशी भीतीही वाटू लागलेली आहे .

लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यांना निवडून देतो असे खासदार आमदार आपल्याहाती आणि इतर माध्यम आहेत म्हणून थेट प्रक्षेपणात गुंडगिरीची भाषा करू लागले आहे अर्वाच्च्य शब्द वापरू लागले, एकमेकांवर बेताल आरोप करत आहेत हे पाहताना, हीच सगळे माणसं पूर्वी एकत्र काम करत होती तिच मग आता वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांचे कपडे फाडत असताना जनतेचा वेळ आणि पैसा का वाया घालवत आहेत? असा प्रश्न आम्ही विचारतोय…

आणि जर सत्ताधारी प्रशासक आणि विरोधक यांच्यात सातत्याने तुंबळ वाद होत असतील आणि प्रकरण हातघाईपर्यंत  येत असेल  तर राज्याचे पालक म्हणून राज्यपाल महोदयांनी याकडे स्वतःहून लक्ष देऊन सर्वपक्षीयाना बोलवून महिलांच्या विषयाकडे लक्ष वेधले पाहिजे! शिवरायांच्या या महाराष्ट्रात चाललेली चिखलफेक थांबायला हवी सर्वपक्षीय महिला नेत्या, पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र करून महिलांसाठी काम करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई  गोर्‍हे यांच्या नेतृत्वात सुसंवाद व्हावा. ही रस्त्यावरची मारामारी, पक्षीयताकद, गटाचे वर्चस्व  दाखवण्याची गुंडागिरी  थांबवून सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता आणि महिला यांचे जगणे सुरक्षित व्हावे म्हणून काही नियमावली आणि काही सूचना गृह विभागाला पोलीस खात्याला देण्याची गरज आहे.

आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे महिला बालकल्याण विभाग आहे असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका ही यात महत्त्वपूर्ण  असायला हवी होती! मात्र एकूणच विषयात ते काहीही बोलताना दिसत नाही आणि म्हणून महिला बालकल्याण विभागाला अभ्यासू सर्वसामावेशक आणि पक्षापलीकडे जाऊन काम करणारी महिला मंत्री मिळाली तर उत्तम होईल.  आपापसात भांडणारी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण लोकांसाठी काम करतोय आणि  स्त्रीसन्मानाच्या बाता मारताना आपण महिलांवरच अन्याय करत असू;   अभद्र भाषा बोलत असून तर अशा नेत्यांना मंत्र्यांना एक क्षणही त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही!

गृह खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे असे कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे तर प्रचंड स्त्रीस्वातंत्र्यवादी भूमिकेचे आहेत! त्यांनी आपल्या पत्नीला स्वतःचं करिअर करण्यासाठी स्वातंत्र्य दिलेले पाहता  अनेकजण अचंबित झाले होते; मात्र तेच गृहमंत्री स्त्री सन्मानाच्या बाबतीत महिलांचा अपमान होत असताना, शिवीगाळ होत असताना, हाणामारी होत असताना; कोणतीही कृती करताना, समजावणीचा शब्द बोलताना दिसत नाही ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट नक्कीच नमूद करावीशी वाटते.

या विषयावर खूप काही लिहिता येईल पण सध्याच्या घडीला प्रत्येक जण हिरीरीने पेटला आहे की, आम्हीच कसे खरे, आम्हीच म्हणजे कडवे हिंदुत्ववादी, कडवे सनातनी, कडवे पुरोगामी…या सगळ्यात  किमान महिलांना सन्मानाने जगता यावं, पत्रकारांना सन्मानाने जगता यावं! अभिव्यक्ती करताना आणि जगताना किमान माणूस म्हणून त्यांना जगता यावं इतके वातावरण असावं आणि राजकारणात महिलांनी काम करण्यासाठी पुढे यावं इतकी माणुसकी सगळ्यांनीच जोपासायला हवी!

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी