आणि सारेच रमले असे… भजन..हरिपाठ, किर्तनाने श्री संत तुकाराम महाराज बिजाेत्साेवाला आली रंगत

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

खोतवाडीतील पारायण सोहळा उत्साहात पार

समाजसेवक शंकरदादा मोहिते यांचे विशेष सहकार्य

शिराळा (जी.जी.पाटील)

खोतवाडी (ता.शिराळा) येथे श्री.संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिम्मित्त आयोजीत करण्यात आलेला अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.

सोनवडेपैकी खोतवाडी येथे झालेल्या पारायण सोहळ्यामध्ये काकड आरती,भजन हरिपाठ,किर्तन यासारखे दैनदिन कार्रक्रम पार पडले तसेच पारायण कालावधीमध्ये ह.भ.प- शिवाजी महाराजभोसले(कोरेगाव),ह.भ.प-बाजीराव महाराज (भाडुगळेवाडी), सुभाष महाराज(शिवाजीनगर),शंकर मोरे महाराज(आंबवडे),नारायण महाराज सलते (सलतेवाडी), अनंत महाराज (शिखरवाडी), पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी),बाजीराव महाराज जाधव(सोनवडे) आदींनी किर्तनातून ज्ञानदान केले.

खोतवाडी येथील पारायण सोहळ्यामध्ये एकनाथ महाराज,बाजीराव महाराज,सोपान महाराज आदि मंडळीनी व्यासपीठचालक म्हणुन काम पाहिले याचबरोबर या पारायण सोहळ्यासाठी समाजसेवक शंकरदादा मोहिते यांचे या सप्ताहासाठी विशेष सहकार्य लाभले .

VIDEO पहा- लिंकला ला क्लिक कराः  –https://youtu.be/ATVLa9LsL0k

पारायण सोहळ्याच्या निमित्ताने खोतवाडी गावातुन टाळ मृदुंगाच्या गजरात रामकृष्ण हरी च्या गजरात दिंडी सोहळा काढण्यात आला यावेळी गावातील महिला पुरुष युवक पारंपारिक वेश परिधान करुन दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी मृदंगवादक – प्रमोद कुंभार यांनी मृदंग वादनाने पारायण सोहळ्यातील किर्तनात रंगत भरली तसेच या सोहळ्यासाठी सांप्रदायिक,सामाजिक,राजकीय, क्षेत्रातील विविध मंडळींनी भेटी देवुन शुभेच्छा दिल्या. खोतवाडी येथील पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी एकनाथ राणे,दिपक राणे,सोपान खोत,लक्ष्मण खोत,वसंत मोहिते,तुकाराम खोत,यशवंत खोत,दिलीप खोत,अशोक खोत,शंकरदादा मोहिते यांचेसह खोतवाडी पारायण मंडळाचे व ग्रामस्थ परिश्रम घेतले.

घाेसरवाडकरवासियांचे अखेर स्वप्न पूर्ण… श्री राम मंदिरात हाेणार रामसीता-लक्ष्मण मुर्ती प्रतिष्ठापणा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.