कोल्हापूर- काेल्हापूर जिल्ह्यातील घाेसरवाड येथे सध्या भक्तीपूर्ण वातावरणाची रेलचेल आहे. गेली पाच वर्ष रखडलेले स्वप्न सत्यात उतरत आहे. उत्तर भारतीय समाजाच्या पुढाकारानेच हे घाेसरवाडकर ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीला पूर्णविराम मिळाला आहे. ७० वर्षानंतर घाेसरवाड पंचक्राेशीत भव्यदिव्य असे अयाेध्याच्या प्रतिकृतीसारखे आणि तेथील चरणस्पर्शानेच श्रीराम मंदिर उभे राहत असून, प्रभू श्री रामचंद्र आणि सीता माता लक्ष्मण आणि हनुमान यांची मुर्ती काेल्हापूर शहरात दाखल झाली आहे.
या सर्व मुर्ती माेठ्या भक्तीभावाने, वाजत गाजत, श्रीरामाच्या जयघाेषात घाेसरवाड येथे रवाना झाल्या. दरम्यान, प्रभू रामचंद्रांचे दर्शन करवीर वासीयांना घडावे यासाठी अजय सिंह, ब्रिजेश उपाध्याय, भवानी सिंग (सरकार), उपदेश सिंग, आणि इतर कोल्हापूरातील उत्तर भारतीय लाेकांनी काेल्हापूर येथे व्यवस्था केली हाेती. यावेळी असंख्य भाविकांनी मनाेभावे दर्शन घेतले.
अजय सिंह यांनी घाेसरवाडकर यांचे स्वप्न पूर्ण हाेण्यासाठी आणि त्यांना प्रभू श्री रामचंद्र आणि सीता माता लक्ष्मण आणि हनुमान यांची साकारलेली मुर्ती भेट देऊन,बहूमुल्य वाटा उचलला आहे. यामुळे घाेसरवाडकर ऋृणी असल्याची भावना समस्त भाविक व लाेकांनी मुर्ती घेऊन जाताना व्यक्त केली. प्रभू रामचंद्रांचे दर्शन करवीर वासीयांना घडावे यासाठी अजय सिंह, ब्रिजेश उपाध्याय, भवानी सिंग (सरकार), उपदेश सिंग, आणि इतर कोल्हापूरातील उत्तर भारतीय समजतील लोकांनी नियोजन केले. या दर्शनाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला हाेता.
७० वर्ष्पासून स्वप्न उराशी बाळगून राहिलेल्या घाेसरवाडकर ग्रामस्थ आणि भाविकांच्या गावी प्रभू श्री रामचंद्र आणि सीता माता लक्ष्मण आणि हनुमान यांची मुर्ती दाखल झाली आहे. येत्या गुरुवारी २३ मार्चला घाेसरवाडकर येथे ध्वजाराेहन, मुहुर्तमेढ चा तसेच श्री राम मुर्तीसह रथाेत्सवाची श्री सिद्धेश्वर पालकी मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर वास्तू शांत, मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. २४ मार्च राेजी अखंड श्री हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण साेहाेळा, काकड आरती हरीपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन केले आहे. देवव्रत विवेकानंद वासकर महाराज यांच्या अमृतहस्ते श्री राम मंदिरचा व श्री राम मुर्ती प्राणप्रतिष्ठापण करण्यात येणार आहे. यावेळी ह. भ. प. गुरुवर्य विठ्ठल दादा वासकर महाराज यांच्या किर्तनाने या साेहाेळ्याला रंगत येणार आहे. श्री. नरेंद्र जिजाबाई तुकाराम माने चँरीटेबल ट्रस्ट, घाेसरवाड ता. शिराेळ यांनी हा संपूर्ण धार्मिक उत्सव आयाेजित केलेला आहे.
उत्तर भारतीय समाजाचे उपकार घोसरवाडकर ग्रामस्थ या जन्मात विसरणार नाहीत, अशा भावनिक प्रतिक्रिया आज प्रभू श्री रामचंद्र आणि सीता माता लक्ष्मण आणि हनुमान यांची मुर्ती घोसरवाड येथे रवाना हाेताना भाविक व समस्त ग्रामस्थांच्यातून उमटत होत्या. गेल्या 70 वर्षांपासून घोसरवाड पंचक्रोशीत भव्य श्रीराम मंदिर व्हावं अशी इथल्या तमाम लोकांची इच्छा होती. ती साकारत असल्याने घाेरसवाडकर गावात आनंदाेत्सव साजरा केला जात आहे. काेराेनाचे संकट, महापूराचा धाेका यामुळे राम मंदिर साकारताना अनेक अडचणी येत हाेत्या. मात्र उत्तर भारतीय समुदाय आणि जय सिंह, ब्रिजेश उपाध्याय, भवानी सिंग (सरकार), उपदेश सिंग यांच्यासह उत्तर भारतीय समाजाने पुढाकार घेतल्याने एक हात मदतीचा तसेच धार्मिक कार्याला साथ दिली.
पुणे हे स्वीडनमधील उद्योजकांचे ‘सेकंड होम’- देवेंद्र फडणवीस
घाेसरवाडींसाेबत असलेली आत्मयिता, त्यांची मंदिर बांधण्याची तीव्र इच्छा.. प्रभू रामचंद्रावरील भक्ती-श्रद्धा यामुळेच आम्हालाही प्रेरणा मिळाली. त्यामुळेच आमच्या हातूनही श्री राम मंदिर व मुर्ती दानचा कार्यक्रम पुर्णत्वाला गेला. प्रभू रामचंद्राचे आदेश आणि घाेसरवाडवासियांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास, एक मदतीची संधी दिली म्हणूनच आम्ही या धार्मिक कार्यक्रमाला जाेडलाे गेलाे. यातूनच आम्हालाही प्रभू रामचंद्रची सेवा करण्याची संधी मिळाली. असेच सत्कार्य यापुढेही घडू दे आणि घाेसरवाडवासियांची मंदिर व प्रभू श्री रामचंद्र आणि सीता माता लक्ष्मण आणि हनुमान यांच्यावरी श्रद्धा, विश्वास वाढू देत हीच श्री रामचरणी प्रार्थना अशी प्रतिक्रीया अजय सिंह यांनी दिली. श्री प्रभू रामचंद्र यांच्याच आदेशाने माझ्या हातून हा छाेटासा खारीचा वाटा उचलला गेल्याचे अजय सिंह यावेळी म्हणाले.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
घोसरवाड ग्रामपंचायत मंदिर ट्रस्ट तसेच या पंचक्रोशीतील शेकडो लोक या मूर्तीच्या आगमनासाठी कोल्हापुरात दाखल झाले हाेते. ताराबाई पार्क येथील अजय सिंह यांच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे करवीर वासियांनी दर्शन घेतले. आज सकाळी अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात आणि विधिवत पूजा करीत या मुर्त्या घोसरवाड ग्रामस्थांच्या कडे सुपूर्त करण्यात आल्या. वाजत गाजत या मुर्त्या घोसरवाडच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी समस्त उत्तर भारतीय समाज सहकुटुंब उपस्थित होते. प्रभू रामचंद्रांचे दर्शन करवीर वासीयांना घडावे यासाठी अजय सिंह, ब्रिजेश उपाध्याय, भवानी सिंग (सरकार), उपदेश सिंग, आणि इतर कोल्हापूरातील उत्तर भारतीय समजतील लोकांनी नियोजन केले.
गुळासाठी काेल्हापूर जिल्हा जगप्रसिद्ध…मात्र गुऱ्हाळग्रहांची संख्या कमी!